सूरज पांचोलीचा 'सॅटेलाइट शंकर' चित्रपट ह्या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 14:10 IST2019-05-01T14:09:42+5:302019-05-01T14:10:10+5:30
सूरज लवकरच 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात सूरज जवानाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सूरज पांचोलीचा 'सॅटेलाइट शंकर' चित्रपट ह्या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेता सूरज पांचोली तब्बल चार वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करतो आहे. २०१५ साली 'हिरो' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आता तो कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. सूरज लवकरच 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात सूरज जवानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट आधी 5 जुलैला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा सिनेमा 6 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सूरजने 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हिमाचल प्रदेशमधील चिटकुल, आग्रा, पंजाब, तमीळनाडू आणि महाराष्ट्रातील जवानांच्या कॅम्पला भेट दिली आहे. त्याने त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कामाबद्दल व मेहनतीबद्दल जाणून घेतले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी सूरज ज्या वीस जवानांना भेटला त्यांच्यासोबत प्रमोशनल ट्रॅक बनवण्याचे ठरवले आहे. या व्हिडिओचे शूटिंग १५ मे रोजी मुंबईत पार पडणार आहे.
या चित्रपटाच्या अनुभवाबाबत सूरज म्हणाला की,'आपण जवानांमुळे इथे सुरक्षित राहत आहोत. ते सीमेवर आपली रक्षा करण्यासाठी सदेैव तत्पर असतात. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपले जवान शहीद झाले. कित्येक दिवस ते आपल्या कुटुंबियांना भेटत नाहीत. '
इरफान कमल दिग्दर्शित 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटात सूरजसोबत मेघा आकाश मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.