​सर्जरीने बिघडला चेहरा अन् इंडस्ट्रीतून बाद झाली ‘ही’ अभिनेत्री! आता करणार टीव्हीवर ‘वापसी’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 07:17 AM2018-02-19T07:17:18+5:302018-02-19T12:50:44+5:30

मॉडेल ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी मीनिषा लांबा गेल्या पाच वर्षांपासून इंडस्ट्रीतून गायब आहे. ‘कॅडबरी’च्या  जाहिरातीतून घराघरात पोहोचलेला ...

Surgery erupted face and industry was the only 'actress'! Now 'return' to TV! | ​सर्जरीने बिघडला चेहरा अन् इंडस्ट्रीतून बाद झाली ‘ही’ अभिनेत्री! आता करणार टीव्हीवर ‘वापसी’!!

​सर्जरीने बिघडला चेहरा अन् इंडस्ट्रीतून बाद झाली ‘ही’ अभिनेत्री! आता करणार टीव्हीवर ‘वापसी’!!

googlenewsNext
डेल ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी मीनिषा लांबा गेल्या पाच वर्षांपासून इंडस्ट्रीतून गायब आहे. ‘कॅडबरी’च्या  जाहिरातीतून घराघरात पोहोचलेला हा चेहरा अचानक बॉलिवूडमधून दिसेनासा झाला होता. पण आता हा चेहरा छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा दिसणार आहे. होय, पाच वर्षांनंतर मीनिषा टीव्हीवर वापसी करणार आहे. २०१४ मध्ये ‘बिग बॉस’च्या ८ व्या सीझनमध्ये मीनिषा दिसली होती. अर्थात स्पर्धक म्हणून तिचा या शोमधील प्रवास फार लवकर संपला होता. तेव्हापासून मीनिषा इंडस्ट्रीतून पुरती गायब झाली होती. मध्यंतरी ‘लव का इंतजार है’ या मालिकेत मीनिषा दिसणार, अशी बातमी आली. पण असे झाले नाही. आता मात्र मीनिषा सब टीव्हीच्या ‘तेनाली राम’ या मालिकेत विषकन्येच्या भूमिकेत दिसणार आहे.



 २००५ मध्ये ‘यहां’ या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करणाºया मीनिषाने ‘कॉपोर्रेट’, ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘दस कहानियॉ’आदी चित्रपटांमध्ये काम केले. २००८ मध्ये  ‘बचना ए हसीनों’ या चित्रपटाने तिला ओळख दिली. परंतु बॅक टू बॅक हिट चित्रपट देणे अशक्य होऊ लागल्याने तिच्या करिअरचा ग्राफ खाली येऊ लागला. खरे तर मीनिषाचा बॉलिवूडमधील करिअर ग्राफ घसरण्यामागे वेगळेच कारण सांगितले जाते. ते म्हणजे, तिने केलेली प्लास्टिक सर्जरी. चित्रपटात जम बसण्याच्या काळात अधिक सुंदर दिसण्याच्या नादात मीनिषाने नाकावर प्लास्टिक सर्जरी केली. पण या प्लास्टिक सर्जरीने सुंदर दिसण्याऐवजी मीनिषाचा चेहरा बिघडला आणि पुढे तिला चित्रपट मिळणे बंद झाले. अर्थात प्लास्टिक सर्जरी केल्याची बाब मीनिषा कायम नाकारत आली आहे.



२०१५ मध्ये तिने बॉयफ्रेन्डसोबत लग्न केले. याचदरम्यान लॉस वेगास येथे पोकर (एक प्रकारचा जुगार) खेळण्यास तिने सुरुवात केली.  सात वर्ष पोकर खेळल्यानंतर अलीकडे ती प्रोफेशन पोकर प्लेयर म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. त्याचबरोबर पहिली सेलिब्रिटी पोकर प्लेयर म्हणूनही तिच्याकडे बघितले जात आहे.  तिने आतापर्यंत लास वेगासमध्ये डब्ल्यूपीटी ५०० एरिया पोकर टुनार्मेंट, इंडियन पोकर चॅम्पियनशिप, हेल्टिन पोकर आणि गोव्यात झालेल्या कित्येक पोकर टूनार्मेंट्समध्ये सहभाग नोंदविला आहे. 

Web Title: Surgery erupted face and industry was the only 'actress'! Now 'return' to TV!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.