चक्क करिना कपूरचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी धुतले होते पाय,पण का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 03:10 PM2021-11-27T15:10:22+5:302021-11-27T15:10:46+5:30
चित्रपटात अमिताभ यांनी रणधीर कपूर यांचा फायटिंग सीन होता.या सीनचे चित्रीकरण सुरु असताना करिना तिथेच होती. हा सीन पाहून करिना अमिताभ यांच्यावर प्रचंड चिडली होती.
हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह महानायक अमिताभ बच्चन यांच्या समोर आजही भल्याभल्यांची बोलती होते बंद.चाहते आजही त्यांना देवाप्रमाणे पुजतात. या वयातही तरुण कलाकारांनाही लावजवतील असा त्यांचा उत्साह असतो.महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे कोट्यवधी चाहते आहेत. फक्त चाहतेच नाही तर सेलिब्रेटींसाठी ते आदर्श आहेत.अनेकांना त्यांच्यासारखे काम करत लोकप्रियता मिळवण्याची इच्छा असते.
अमिताभ यांच्या फिल्मी करिअरप्रमाणे खासगी आयुष्यातले किस्से जाणून घेण्यात रसिकांना फार उत्सुकता असते.असाच सध्या त्यांचा एक किस्सा प्रंचड चर्चेत आहे.यावेळी अमिताभ यांच्यामुळे बेबो करिना कपूरही प्रचंड चर्चेत आली आहे. चर्चेत असणारा किस्सा फार जुना आहे. अमिताभ रणधीर कपूर यांच्यासोबत 'पुकार' या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते.त्यावेळी रणधीर बरोबर चिमुकली करिनासुद्धा आली होती.
करिनाच्या पायाला जखम झाली होती. खुद्द अमिताभ यांनी करिनाचा पाय पाण्याने स्वच्छ केला आणि जखमेवर औषध लावले होते. इतकंच काय तर चित्रपटात अमिताभ यांनी रणधीर कपूर यांचा फायटिंग सीन होता.या सीनचे चित्रीकरण सुरु असताना करिना तिथेच होती. हा सीन पाहून करिना अमिताभ यांच्यावर प्रचंड चिडली होती.अमिताभ यांनी रणधीर यांना मारु नये यासाठी करिनाने अमिताभ यांचे पाय घट्ट पकडून ठेवले होते. हे सगळं पाहून करिना खूपच चिडली होती.
तिला शांत करण्यासाठी अमिताभने पाणी मागवले तिचे पाय धुतले होते. असे त्यांनी लिहीलेल्या त्यांच्या एका ब्लॉगमध्ये या खास आठवणीचा उल्लेख केला होता. यासोबत शूटिंगदरम्यानचा एक फोटोही त्यांनी शेअर केलो होता. फोटोत दिसणारी चिमुरडी ही करिना कपूर होती. अनेकांना या फोटोत चिमुकली करिनाला ओळखणेही कठीण जाणार.