दिग्दर्शकांना पाहायचे असायचे माझे cleavage & thighs, या अभिनेत्रीने केला खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 17:21 IST2019-09-23T17:11:35+5:302019-09-23T17:21:58+5:30
ही अभिनेत्री एकदा किंवा दोनदा नव्हे तर पाच वेळा कास्टिंग काऊचला बळी पडली आहे.

दिग्दर्शकांना पाहायचे असायचे माझे cleavage & thighs, या अभिनेत्रीने केला खळबळजनक खुलासा
सुरवीन चावलाने आपल्या करियरची सुरूवात एकता कपूरच्या ‘कही तो होगा’ या लोकप्रिय मालिकेद्गारे केली. या मालिकेत तिने एक महत्त्तवाची भूमिका साकारली होती. तसेच कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकेत प्रेरणा आणि मिस्टर बजाज यांच्या छोट्या मुलीची तिने भूमिका साकारली होती. छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर ती मोठ्या पडद्याकडे वळली. तिने हेट स्टोरी, पार्च्ड, क्रिएटर थ्रीडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिने आजवर हिंदीसोबतच पंजाबी, दाक्षिणात्य भाषेत काम केले आहे. सेक्रेड गेम्स या प्रसिद्ध वेबसिरिजच्या दुसऱ्या सिझनला देखील प्रेक्षकांना तिला पाहायला मिळाले होते. सुरवीनने आता बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचविषयी एक खळखळजनक खुलासा केला आहे.
सुरवीन तिच्या आजवरच्या करियरमध्ये एकदा किंवा दोनदा नव्हे तर पाच वेळा कास्टिंग काऊचला बळी पडली आहे. तिनेच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडमध्ये तिला आलेल्या वाईट अनुभवांविषयी सांगितले आहे. बॉलिवूडमध्ये तिला आलेल्या अनुभवांविषयी पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत तिने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तिने या मुलाखतीत म्हटले आहे की, तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एका दिग्दर्शकाला माझे क्लेव्हेज पाहायचे होते तर एका दिग्दर्शकाला माझी मांडी पाहाण्यात रस होता. मला यांसारख्या वाईट अनुभवांना बॉलिवूडमध्ये सामोरे जावे लागले. एवढेच नव्हे तर माझे वजन जास्त आहे असे काही जण मला सांगायचे. माझे वजन जास्त आहे हे ऐकून काय बोलायचे हेच मला सुचायचे नाही. मी एका ऑडिशनला गेले होते तिथे तू खूपच जाडी असल्याचे मला सांगितले. पण त्यावेळी माझे वजन फक्त 56 किलो होते. मला ते जाडे बोलत असल्याने त्या लोकांना चष्म्याची गरज आहे का असा प्रश्न मला पडला होता.
सुरवीनने आज बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या असून तिच्या अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.