मला छातीचं, कमरेचं माप विचारलं गेलं..., सुरवीननं सांगितला कास्टिंग काऊचचा शॉकिंग अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 11:08 AM2021-12-15T11:08:02+5:302021-12-15T11:10:55+5:30
Surveen Chawla On Facing Casting Couch : चित्रपटात काम करण्यासाठी ब-याच अभिनेत्रींना वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो. अभिनेत्री सुरवीन चावला यापैकीच एक.
ग्लॅमर इंडस्ट्रीच्या झगमगाटाआड खूप मोठी रहस्य दडलेली असतात. अर्थात आपल्याला दिसतो तो फक्त झगमटात. ग्लॅमर इंडस्ट्रीत काम मिळवणं सोप नसतं. चित्रपटात काम करण्यासाठी ब-याच अभिनेत्रींना वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो. अभिनेत्री सुरवीन चावला (Surveen Chawla) यापैकीच एक. एका ताज्या मुलाखतीत तिने कास्टिंग काऊचचा (Casting Couch) धक्कादायक अनुभव सांगितला आहे. मी चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेले असता मला छातीचं, कंबरेचं माप विचारलं गेलं, असं ती म्हणाली.
काय म्हणाली सुरवीन...
मी टेलिव्हिजनसाठी काम करत असताना चित्रपटांत करिअर बनवण्याचा प्रयत्न करते होते. मुंबईत एका चित्रपटासाठी पहिल्यांदा मी ऑडिशन देणार होते. मी ऑडिशनसाठी गेले आणि तिथे मला माझ्या दिसण्यावर प्रश्न विचारले गेले. माझ्या छातीचं माप, कंबरेचं माप विचारलं गेलं. या मापदंडांवर कुठल्याही स्त्रीचं मूल्यमापन होऊ शकत नाही. साऊथ इंडस्ट्रीतही मी हेच अनुभव घेतले. सुरूवातीचे दिवस खरंच खूप वाईट होते. अर्थात गेल्या काही वर्षात खूप काही बदललं आहे, ही समाधानाची बाब आहे.
मी पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा मला बॉडी शेमिंगलाही सामोरं जावं लागलं होतं. माझं वजन 56 किलो असल्यानं मला भूमिका मिळणार नाहीत, असं मला सांगण्यात आलं होतं, असं आरजे सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सुरवीन म्हणाली.
सुरवीनने 2003 मध्ये ‘कही तो होगा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर ‘कसौटी जिंदगी की’, ‘काजल’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं. ‘एक खिलाडी एक हसीना’ या डान्स शोमध्येही तिने भाग घेतला होता. 2008 साली ... या कन्नड चित्रपटातून तिने फिल्मी दुनियेत पदार्पण केलं. बॉलिवूडच्या हम तुम शबाना, अग्ली, हेट स्टोरी 2, पार्च्ड अशा चित्रपटांत ती झळकली. काही वेबसीरिजमध्येही तिने भूमिका साकारल्या.