Suryakumar Yadav Biopic : श्रेयस तळपदेने बायोपिकमध्ये माझा रोल करावा; सूर्यकुमार यादवची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 11:48 AM2022-11-30T11:48:06+5:302022-11-30T11:58:20+5:30

SKY 'स्काय' ची बॅट जेव्हा तळपते तेव्हा त्याच्यासमोर भलेभले गारद होतात हे क्रिकेटप्रेमींनी बघितले आहे.

suryakumar-yadav-said-he-would-like-shreyas-talpade-to-play-in-his-biopic | Suryakumar Yadav Biopic : श्रेयस तळपदेने बायोपिकमध्ये माझा रोल करावा; सूर्यकुमार यादवची इच्छा

Suryakumar Yadav Biopic : श्रेयस तळपदेने बायोपिकमध्ये माझा रोल करावा; सूर्यकुमार यादवची इच्छा

googlenewsNext

Suryakumar Yadav Biopic : भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज सूर्यकुमार यादवने त्याच्या अप्रतिम खेळीने सर्वांनाच मन जिंकले आहे. SKY 'स्काय' ची बॅट जेव्हा तळपते तेव्हा त्याच्यासमोर भलेभले गारद होतात हे क्रिकेटप्रेमींनी बघितले आहे. त्याच्या फलंदाजीने तो क्रिकेटप्रेमींना खुश करायची संधी तो कधीच सोडत नाही. चाहत्यांनी त्याला विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज फलंदाजांच्या रांगेत आणून बसवले आहे. म्हणजेच त्याच्याकडुन क्रिकेट रसिकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत सूर्यकुमारने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यामध्ये त्याने आपल्यावर बायोपिक बनली तर त्यात कोणी भुमिका करावी हे सुद्धा सांगितले आहे.

भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवच्या चाहत्यांची संख्या वाढतच चालली आहे. मग अगदी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला सुद्धा सूर्यकुमार यादवच्या बॅटिंगची भुरळ पडली आहे. तर सूर्यकुमार यादवने मुलाखतीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तुझ्यावर जर बायोपिक आला तर त्यात कोणी भुमिका साकारावी असे  विचारले असता  मराठी अभिनेता 'श्रेयस तळपदे'ने भुमिका केली तर नक्कीच आवडेल असे त्याने म्हणले आहे.

श्रेयस तळपदेने यापुर्वी 'इक्बाल' आणि 'कौन प्रविण तांबे' असे हिट चित्रपट दिले आहेत. २००५ मध्ये आलेल्या 'इक्बाल' या सिनेमातुन त्याने कर्णबधिर मुलाची भुमिका केली ज्याला क्रिकेटपटू होण्याची असते. श्रेयसची ही भुमिका कायम लक्षात राहणारी आहे. तर याचवर्षी आलेल्या 'कौन प्रविण तांबे' यामध्येही त्याने अप्रतिम काम केले होते.

Web Title: suryakumar-yadav-said-he-would-like-shreyas-talpade-to-play-in-his-biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.