सुशांतने अंकिताला टाळले, किर्तीला बोलवले !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2016 02:03 PM2016-06-18T14:03:30+5:302016-06-18T19:33:30+5:30
सुशांतसिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपची बातमी आता जुनी झालीय.अर्थात अंकिता अद्यापही या ब्रेकअपच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतेय. ...
स शांतसिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपची बातमी आता जुनी झालीय.अर्थात अंकिता अद्यापही या ब्रेकअपच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करतेय. याऊलट सुशांत मात्र यातून कधीच बाहेर पडलाय. केवळ बाहेर पडलाच नव्हे तर त्याला त्याचे नवे प्रेम(??) ही मिळाले आहे. होय,सुशांतची नवी गर्लफ्रेन्ड(??) किर्ती सेनन. बुडापेस्ट येथे ‘राबता’च्या शूटींगदरम्यान सुशांत व किर्ती भलतेच जवळ आलेत. एकमेकांच्या ताटात जेवनापासून तर शूटींगनंतर एकमेकांसोबत खासगी क्षण घालवण्यापर्यंत सुशांत व किर्ती परस्परांत गुंतले. आता किर्ती व सुशांत दोघेही मुंबईत परतले आहेत आणि इथे तर त्यांचे प्रेम आणखीच बहरत असल्याची खबर आहे. होय, अलीकडे सुशांतने बांद्रयातील हिल रोड येथे नवीन फ्लॅट घेतला. या फ्लॅटच्या वास्तूपूजन कार्यक्रमाला सुशांतचे अगदी जवळचे मित्र हजर होते. किर्तीला या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रण होते म्हणे. साहजिक अंकिता यावेळी नव्हती. सूत्रांच्या मते, सुशांत किर्तीसोबत आनंदात आहे. अंकितासोबत सुशांतला आता कुठलेही रिलेशन नकोय. त्यामुळेच की काय, सुशांत मुंबईत आला तरिही मलाड येथील त्याच्या जुन्या घरात गेलाच नाही. तेथील सामानाची आवराआवर करायलाही तो गेला नाही. अंकिताच्या आठवणीही त्याला नकोय, हेच यावरून दिसते.