श्रुती मोदीच्या वकिलाचा दावा, म्हणाले- "बहिणींना सुशांतच्या 'त्या' ड्रग्स पार्टीची होती माहिती"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 01:21 PM2020-08-31T13:21:41+5:302020-08-31T13:37:17+5:30
श्रुती मोदीचे वकील अशोक सरावगी यांनी दावा केला आहे की सुशांत ड्रग्सचे सेवन करायचा.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआय सगळ्यांची वारंवार चौकशी करते आहे. सीबीआय त्या सर्व लोकांची चौकशी करते आहे जे शेवटच्या दिवसांमध्ये सुशांतसोबत होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीची देखील सीबीआय चौकशी करते आहे. चौकशी सुरू असतानाच महत्वाची माहिती पुढे येत आहे. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीचे वकील अशोक सरावगी यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
कुटुंबीयांना माहिती होते सुशांत ड्रग्स घ्यायचा
श्रुती मोदीचे वकील अशोक सरावगी यांनी दावा केला आहे की सुशांत ड्रग्सचे सेवन करायचा. एका मुलाखती दरम्यान अशोक म्हणाले, फिल्मलाईनमध्ये ड्रग्स ही गोष्ट खूप कॅमन आहे. फक्त रियालाच नाही तर कुटुंबीयांसुद्धा माहिती होते की सुशांत ड्रग्स घ्यायचा ते. ते पुढे म्हणाले की, यामागील कारण म्हणजे सुशांत दोनदा आपल्या बहिणींकडे गेला होता. त्याच्याबरोबर त्याचा ड्रायव्हर सुद्धा होता आणि तोच ड्रायव्हर त्याला ड्रग्स मागवून द्यायचा.
वकिलांनी सुशांतला कंपनी देणाऱ्याच्या नावाचाही पर्दाफाश केला आहे. ''सुशांतचा एक त्याचा मित्र आयुष शर्मा आणि मैत्रिण आनंदी. सुशांतच्या घरात पार्टी झाली होती, त्यात ड्रग्सचा वापर करण्यात आला होता. याची पूर्ण माहिती सुशांतच्या बहिणीला होती.'' वकीलांनी दावा केला आहे की, सुशांत जेव्हा कधी मुंबईच्या बाहेर जायचा त्यावेळी ड्रग्स घेऊन जायचा.
NCB च्या चौकशीतून आतापर्यंत काय खुलासे
१) डार्कनेटच्या माध्यमातून मागवली जात होती ड्रग्स
२) रिया चक्रवर्ती ज्या पॅडलरकडून ड्रग्स घेत होती, ते डार्कनेटच्या माध्यमातून परदेशातून ड्रग्स मागत होते
३) गुन्हे विश्वातील सर्वात मोठं प्लॅटफॉर्म आहे डार्कनेट
४) ड्रग्स, कॉन्ट्रॅक्ट किलिंगसहीत कोणत्याही घटनेसाठी डार्कनेटवर साहीत्य मिळतं
५) सुशांतच्या मृत्यूत डार्कनेट कनेक्शनबाबत करत आहे तपास
६) जगातले केवळ ४ टक्के लोकच या इंटरनेट स्पेसचा वापर करतात, ९४ टक्के स्पेस डार्कनेट किंवा डीप डार्कनेटमध्ये वापर होतो
७) डार्कनेटच्या माध्यमातून फेक आयडी तयार करून गुन्हा करण्यासंबंधी कोणत्याही वस्तू मागितल्या जातात
८) आयडी फेक राहत असल्याने आरोपी पर्यत पोहोचणं अवघड असतं
...और उसका "ईलाज" करवा रही हो; सुशांतच्या वडिलांनाही होती त्याच्या आजाराची माहिती?