डंके की चोट पर कह सकती हूं की, वह....! सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता लोखंडेने पहिल्यांदाच तोडली चुप्पी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 10:41 AM2020-07-31T10:41:01+5:302020-07-31T10:42:15+5:30
वाचा काय म्हणाली...
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा महिना उलटून गेल्यावर सुशांतचे वडिल के के सिंग यांनी याप्रकरणी बिहार पोलिसांत गुन्हा नोंदवला आणि या प्रकरणाने एक वेगळे वळण घेतले. आता सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिने या प्रकरणावर पहिल्यांदा चुप्पी तोडत सुशांत डिप्रेशनमध्ये नव्हताच, असे म्हटले आहे. शिवाय सुशांतच्या मृत्यूवर वेगवेगळे तर्कवितर्क काढणा-यांनाही तिने फटकारले.
रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अंकिता या प्रकरणावर बोलली. मी शंभरटक्के दाव्यानिशी सांगू शकते की, सुशांत डिप्रेशनमध्ये नव्हताच. तो डिप्रेशनला बळी पडेल असा माणूस नव्हताच. तो या जगातून गेल्यावर लोक वेगवेगळ्या कहाण्या बनवत आहेत, वाट्टेल ते तर्कवितर्क काढत आहेत, हे पाहून मला दु:ख होतेय. सुशांत काय होता, हे यांना ठाऊक तरी आहे का? मी सगळ्यांना सांगू इच्छिते की, तो डिप्रेशनमध्ये नव्हताच. तो एक स्वच्छंदी, मनमौजी आणि सतत आनंदात राहणारा मुलगा होता, असे अंकिता म्हणाली.
सुशांतच्या मृत्यूनंतर 15 मिनिटात त्याने आत्महत्या केल्याचे जाहिर केले गेले. त्याच्या मृतदेहाचे फोटो, व्हिडीओ लीक झालेत. सुशांतने आत्महत्या केली, असा निष्कर्ष लगेच कसा काढला जातो? सुशांत महत्त्वाकांक्षी होता. स्वप्नांनी त्याला झपाटलेले होते. तो डायरी लिहायचा. त्यात भविष्यातील 5 वर्षांनंतरचे प्लान लिहायचा. त्याने अनेक स्वप्न पूर्ण केली होती. त्याच्यासाठी डिप्रेशन या शब्दाचा वापर करणे चुकीचे आहे. डिप्रेशनऐवजी अपसेट म्हणू शकतात. त्याला लोकांनी डिप्रेस्ड व्यक्ती म्हणून ओळखावे, अशी माझी इच्छा नाही. तो हिरो होता. मला माहित आहे की, त्याची शेती करण्याची इच्छा होती. काहीच झाले नाही तर मी माझ्या शॉर्ट फिल्म्स बनवेल, असे तो म्हणायचा. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी सुशांतसारखी व्यक्ती डिप्रेशनमध्ये कशी असू शकते? असेही अंकिता या मुलाखतीत म्हणाली.
अंकिता व सुशांत सुमारे 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. ‘पवित्र रिश्ता’ या सिनेमाच्या सेटवर त्यांचे प्रेम झाले होते. हे दोघे लग्नही करणार होते. मात्र अचानक दोघांचे ब्रेकअप झाले होते.