सुशांत सिंग राजपूत व सारा अली खानचा 'केदारनाथ' चित्रपट मार्चमध्ये होणार प्रदर्शित?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 01:09 PM2018-10-23T13:09:29+5:302018-10-24T08:00:00+5:30

'केदारनाथ' चित्रपटाची रिलीज डेट एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळा पुढे गेली आहे. आता समजते आहे की हा चित्रपट पुढील वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

Sushant Singh Rajput and Sara Ali Khan to appear in 'Kedarnath' movie in March? | सुशांत सिंग राजपूत व सारा अली खानचा 'केदारनाथ' चित्रपट मार्चमध्ये होणार प्रदर्शित?

सुशांत सिंग राजपूत व सारा अली खानचा 'केदारनाथ' चित्रपट मार्चमध्ये होणार प्रदर्शित?

googlenewsNext
ठळक मुद्दे'केदारनाथ' चित्रपटात सुशांत सिंग राजपूत व सारा अली खान मुख्य भूमिकेत


'केदारनाथ' चित्रपटाची रिलीज डेट एकदा नाही, दोनदा नाही तर तीन वेळा पुढे गेली आहे. आता समजते आहे की हा चित्रपट पुढील वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे. आधी हा सिनेमा 30 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. याचा अर्थ सारा अली खानचा पदार्पणाचा चित्रपट 'सिंबा' होईल. 'सिंबा' चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, विकी कौशल, यामी गौतम यांचा 'उरी : सर्जिकल स्ट्राइक' जानेवारीत प्रदर्शित होणार आहे. अभिषेक चौबे दिग्दर्शित व सुशांत सिंग राजपूत अभिनीत 'सोनचिरैया' चित्रपट फेब्रुवारीत रिलीज होणार आहे. त्यामुळे केदारनाथ चित्रपट मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट फायनल केलेली नाही. जेव्हापासून केदारनाथ चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हापासून हा सिनेमा अडचणीत सापडतो आहे. आता हा चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे समजते आहे. मार्च २०१९मध्ये एक नाही तर बरेच मोठे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. अक्षय कुमारचा 'केसरी', जॉन अब्राहमचा 'रोमियो अकबर वाल्टेर' आणि शाहरूख खानच्या प्रोडक्शन हाऊसचा 'बदला' चित्रपट मार्च २०१९मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. 'बदला' चित्रपटात अमिताभ बच्चन व तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पिंक चित्रपटानंतर हे दोघे एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. 

Web Title: Sushant Singh Rajput and Sara Ali Khan to appear in 'Kedarnath' movie in March?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.