सुशांतच्या 'त्या' ५० स्वप्नांची यादी, १ हजार झाडं लावायची होती, जाणून घ्या इतर ३९ अपूर्ण इच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:09 IST2025-01-21T12:08:19+5:302025-01-21T12:09:12+5:30

सुशांत सिंग राजपूत आज आपल्यात नाही. पण त्याच्या आठवणी अजूनही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. एकदा त्याने चाहत्यांशी संवाद साधताना आपल्या ५० स्वप्नांची माहिती दिली होती.

Sushant Singh Rajput Birth Anniversary Known His Bucket List Of 50 Dreams Career Struggle | सुशांतच्या 'त्या' ५० स्वप्नांची यादी, १ हजार झाडं लावायची होती, जाणून घ्या इतर ३९ अपूर्ण इच्छा!

सुशांतच्या 'त्या' ५० स्वप्नांची यादी, १ हजार झाडं लावायची होती, जाणून घ्या इतर ३९ अपूर्ण इच्छा!

Sushant Singh Rajput B'day: सुशांत सिंग राजपूतची आज २१ जानेवारी २०२५ रोजी ३९ वी बर्थ ॲनिव्हर्सरी आहे. सुशांत हा मनोरंजन विश्वातील कुशल अभिनेत्यांपैकी एक होता. तो केवळ अभिनयातच नाही, तर अभ्यासातही सर्वगुण संपन्न होता.  १४ जून २०२० रोजी सुशांतने या जगाचा निरोप घेतला असला तरी आजही त्याच्या आठवणीने त्याचे चाहते भावूक होतात. सुशांत सिंग राजपूत आज आपल्यात नसला. पण त्याच्या आठवणी अजूनही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. वयाच्या ३४ व्या वर्षी जगाला निरोप देणारा सुशांत खूप उत्साही आणि आयुष्य समरसून जगणारा व्यक्ती होता. त्याने अनेक स्वप्न पाहिली होती आणि त्यातली काही स्वप्ने त्याने पूर्ण देखील केली होती. पण, सुशांतच्या त्याच्या बकेट लिस्टमधील काही स्वप्न अपूर्णच राहिली. त्याची कोणती स्वप्ने पूर्ण झाली आणि कोणती अपूर्ण राहिली हे जाणून घेऊया.


सुशांत सिंग राजपूत ट्विटरवर हस्तलिखित नोट्समध्ये ५० स्वप्नांची यादी  (Sushant Singh Rajput's Bucket List Of 50 Dreams) शेअर केली होती.  त्यापैकी तो फक्त ११ स्वप्ने पूर्ण करू शकला आणि त्याची ३९ स्वप्ने अपूर्ण राहिली. 

सुशांतच्या स्वप्नांच्या यादीवर एक नजर....

  1. विमान उडवायला शिकणे.
  2. आयर्न मॅन ट्रायथलॉन/मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचा होता.
  3. डाव्या हाताने क्रिकेट खेळणे.
  4. मोर्स कोड शिकणे.
  5. मुलांना अंतराळाबद्दल जाणून घेण्यासाठी मदत करणे
  6. चॅम्पियन्सबरोबर टेनिस खेळणे.
  7. फोर क्लॅप पुश-अप करणे
  8. आठवडाभर चंद्र, मंगळ, गुरू आणि शनि यांच्या कक्षेचे निरीक्षण करणे.
  9. ब्लू होलमध्ये डुबकी मारणे
  10. डबल स्लिटचा प्रयोग करणे
  11. एक हजार झाडे लावणे.
  12. दिल्लीमधील ज्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये मी शिकलो तिथे एक संध्याकाळ घालवणे
  13.  १०० मुलांना नासामध्ये पाठवण्याचे स्वप्न होते.
  14. कैलाशमध्ये जाऊन ध्यानधारणा करणे
  15. पोकर विजेत्या स्पर्धकासोबत खेळणे
  16. पुस्तकाचे लेखन करणे
  17. CERN प्रयोगशाळेला भेट देणे.
  18. ध्रुवीय दिवे पाहताना चित्रकला.
  19. नासाच्या कार्यशाळेत सहभागी होणे
  20. सहा महिन्यांत सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवणे.
  21. सेनोट्समध्ये पोहणे.
  22. जे लोक पाहू शकत नाहीत त्यांना कोडिंग शिकवणे.
  23. जंगलात एक आठवडा घालवणेे.
  24. वैदिक ज्योतिष समजून घेणे.
  25. डिस्नेलँड पार्कमध्ये जाणे
  26. लेगो लॅबला भेट देणे.
  27. घोडा पाळणे.
  28. दहा प्रकारचे नृत्य प्रकार शिकणे.
  29. मोफत शिक्षण मिळावे, यासाठी काम करणे.
  30. एका महाकाय दुर्बिणीने अँड्रोमेडा आकाशगंगा पाहणे आणि त्याचा अभ्यास करणे.
  31. क्रिया योग शिकणे
  32. अंटार्क्टिका फिरणे.
  33. महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षणात मदत करणे.
  34. कॅमेऱ्यात एका सक्रिय ज्वालामुखीचे छायाचित्र टिपणे.
  35. शेती शिकणे.
  36. मुलांना नृत्य शिकवणे.
  37. तिरंदाजी शिकणे
  38. रेस्निक-हॅलिडे यांचे प्रसिद्ध भौतिकशास्त्र पुस्तक वाचणे.
  39. पॉलिनेशियन खगोलशास्त्र समजून घेणे.
  40. पन्नास प्रसिद्ध गाणी गिटारवर वाजवायला शिकणे.
  41. चॅम्पियनसोबत बुद्धिबळ खेळणे.
  42. लॅम्बोर्गिनी खरेदी करणे.
  43. व्हिएन्नामधील सेंट स्टीफन कॅथेड्रलला भेट देणे.
  44. विजुअल साउंड आणि वाइब्रेशनचा प्रयोग करुन पाहणे.
  45. भारतीय संरक्षण दलांसाठी मुलांना तयार करणे
  46. स्वामी विवेकानंदांवर एक माहितीपट बनवणे.
  47. सर्फिंग करणे.
  48. कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करणे.
  49. ब्राझिलियन नृत्य आणि मार्शल आर्ट्सचे प्रकार शिकणे.
  50.  रेल्वेमध्ये बसून युरोप फिरणे हे सुशांतचं शेवटचं स्वप्न होतं. 

 

 


 

 

५० मधील सुशांतने जी ११ स्वप्न पुर्ण केली होती, ती पुढीलप्रमाणे....

  1. डाव्या हाताने क्रिकेट सामना खेळणे.
  2. CERN ला भेट देणे
  3. तिरंदाजी शिकणे
  4. सेनोट्समध्ये पोहणे
  5. दिल्लीमधील ज्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये मी शिकलो तिथे एक संध्याकाळ घालवणे
  6. एका शक्तिशाली दुर्बिणीद्वारे अँड्रोमेडा पाहणे.
  7. ब्लू होलमध्ये पोहायला जाणे
  8. डिस्नेलँड पार्कमध्ये जाणे
  9. सायमॅटिक्स वापरणे.
  10. महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षणात मदत करणे.
  11. सुशांतचे स्वप्न १०० मुलांना नासामध्ये पाठवण्याचे स्वप्न होते, त्यापैकी त्याने दोन मुलांना पाठवले होते.

Web Title: Sushant Singh Rajput Birth Anniversary Known His Bucket List Of 50 Dreams Career Struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.