सुशांतसिंह राजपूतच्या एकूण 50 स्वप्नांची 'बकेट लिस्ट', त्यातल्या किती झाल्या पूर्ण?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 11:56 AM2023-06-14T11:56:21+5:302023-06-14T11:57:27+5:30
१४ जून २०२० रोजी सुशांतने मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
2020 चा लॉकडाऊनचा काळ. जेव्हा सर्वच जण कोरोनासारख्या मोठ्या संकटाला सामोरे जात होते. बाहेरच्या जगाशी फारसा संबंध येत नव्हता. तोच मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाची ती बातमी होती. हे ऐकून कोणालाच विश्वास बसेना की सुशांतने अशा प्रकारचं पाऊल उचललं. सुशांतच्या आयुष्यात एकूण 50 इच्छा होत्या ज्या त्याने लिहून ठेवल्या होत्या. पण सुशांत त्यातल्या केवळ १३ इच्छा पूर्ण करु शकला.
१४ जून २०२० रोजी सुशांतने मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या निधनाने जितका त्याच्या कुटुंबाला धक्का बसला तितकाच सामान्य लोकांना, चाहत्यांनाही बसला. आपला जवळच्याच व्यक्तीचं निधन झाल्याची भावना प्रत्येकाला आली. सुशांतकडे एक डायरी होती ज्यामध्ये त्याने 'बकेट लिस्ट' लिहून ठेवली होती. एकूण 50 इच्छांची ती यादी होती. तर पूर्ण झालेल्या १३ इच्छांना त्याने टिक केले होते.
सुशांतचे जे जे स्वप्न होते त्यात पोकर चॅम्पियनसोबत सामना खेळणं, वैदिक अॅस्ट्रोलॉजी शिकणं, डिझ्नीलँड, एक आठवडा जंगलात राहणं, ६ महिन्यात ६ पॅक अॅब्स बनवणं, पुन्हा एकदा नासा वर्कशॉप जॉईन करणं, युरोपिअन ऑर्गनायझेशन ऑफ न्युक्लिअर रिसर्चला भेट देणं, पुस्तक लिहिणं, १० प्रकारचे डान्सफॉक्म शिकणं, फ्री एज्युकेशन, क्रिया योग शिकणं, लीगो, घोड्याचं पालन, अंटार्टिका जाणं, महिलांना सेल्फ डिफेन्सची ट्रेनिंग देणं अशा काही इच्छा त्याच्या या यादीत होत्या.
सुशांतने ही यादी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली होती. मात्र नंतर त्याने ती डिलीट केली. सुशांतने या यादीतील काही इच्छा नक्कीच पूर्ण केल्या मात्र इतर स्वप्न अपूर्णच राहिले.