सुशांतच्या घरी दोन Ambulance का आल्या होत्या? ड्रायव्हरने केला खुलासा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 12:21 PM2020-08-31T12:21:09+5:302020-08-31T12:21:47+5:30
सुशांतचा मृत्यू १४ जून रोजी झाला होता. आताही सुशांतच्या केसबाबत अशा अनेक गोष्टी ज्यांबाबत लोकांना वेगवेगळ्या शंका आहेत.
सुशांत सिंह राजपूतच्या केसचा तपास सीबीआय वेगाने करत आहे. सोबतच दररोज वेगवेगळे खुलासे वेगवेगळ्या लोकांकडून केले जात आहेत. या केसशी संबंधित लोकांची सीबीआयकडून कसून चौकशी केली आहे. सीबीआई, ईडी आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो वेगवेगळ्या अॅंगलने या केसचा तपास करत आहे. सुशांतचा मृत्यू १४ जून रोजी झाला होता. आताही सुशांतच्या केसबाबत अशा अनेक गोष्टी ज्यांबाबत लोकांना वेगवेगळ्या शंका आहेत. जसे की, सुशांतची डेड बॉडी नेण्यासाठी २ अॅम्बुलन्स का आल्या होत्या. यावर आजही लोकांना प्रश्न पडत आहेत. मात्र, आता अॅम्बुलन्सच्या ड्रायव्हरने याचा खुलासा केला आहे.
...म्हणून बोलवली गेली दुसरी अॅम्बुलन्स?
आता या प्रश्नाचं उत्तर अॅम्बुलन्सच्या ड्रायव्हरने दिलं आहे. एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाचअॅम्बुलन्सचा ड्रायव्हर साहिलने सांगितले की, दुसरीअॅम्बुलन्स का बोलवली गेली होती. सुशांतची बॉडी पहिल्या नाही तर दुसऱ्या अॅम्बुलन्समध्ये नेण्यात आली होती. साहिलने सांगितले की, त्याच्या अॅम्बुलन्सच्या स्ट्रेचरचा पाय मोडलेला होता आणि त्यामुळेच दुसरी अॅम्बुलन्स बोलवण्यात आली होती. नंतर साहिल त्याची अॅम्बुलन्स घेऊन गेला.
अक्षयचा दावा - सुशांतच्या मानेवर निशाण
दुसरी अॅम्बुलन्स अक्षय चालवत होता. तो म्हणाला होता की, त्याला सुशांतच्या घरी पोहोचलेल्या पोलीस टीमकडून फोन आला होता. अक्षयने हेही सांगितलं की, पहिल्या अॅम्बुलन्सच्या स्ट्रेचरचा पाय मोडला होता आणि त्यामुळे दुसरी अॅम्बुलन्स बोलवण्यात आली होती.
अक्षयनने सांगितले होते की, त्यानेच त्याच्या हेल्परच्या मदतीने सुशांतची बॉडी बेडवरून उचलून कव्हरमध्ये टाकली होती. सुशांतच्या बॉडीवर निशाण असल्याचे दावे केले जात आहे. यावर अक्षय म्हणाला होता की, सुशांतच्या केवळ मानेवर निशाण होते. दुसरीकडे कुठे निशाण नव्हते.
हे पण वाचा :
काय आहे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं डार्कनेट कनेक्शन?
सरकारी साक्षीदार होण्यास सिद्धार्थ, दिपेशची तयारी? नवे वळण येण्याची शक्यता
सुशांतच्या खात्यात होते 70 कोटी, रिया व तिच्या कुटुंबावर 50 लाखांची उधळपट्टी!