सुशांत सिंग राजपूत प्रकरणात हत्येचा पुरावा नाही, तपास सुरू आहे; सीबीआय अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 06:39 PM2020-09-01T18:39:13+5:302020-09-01T18:39:48+5:30

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा सध्या सीबीआय तपास करत आहे. नुकतीच सीबीआय अधिकारीने महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

Sushant Singh Rajput case has no evidence of murder, investigation is underway; Important information of CBI officer | सुशांत सिंग राजपूत प्रकरणात हत्येचा पुरावा नाही, तपास सुरू आहे; सीबीआय अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण माहिती

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात हत्येचा पुरावा नाही, तपास सुरू आहे; सीबीआय अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण माहिती

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते बऱ्याच लोकांची चौकशी करत आहेत. दरम्यान सीबीआय अधिकारीने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, सुशांत सिंग राजपूतची हत्या झाल्याचा अद्याप एकही पुरावा आतापर्यंत सापडलेला नाही. अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुशांत 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले होते.

इंडिया टुडेच्या रिपोर्ट्सनुसार, सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते आत्महत्येच्या अँगेलने सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच आत्महत्येला कुणी प्रवृत्त केले का, याचा देखील तपास करत आहेत.

सीबीआयने आतापर्यंत सुसाइड सीन रिक्रिएट करून पाहिला. मुंबई पोलिसांकडून सर्व पुरावे आणि तपासाचा आढावा घेतला. तसेच या प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्तीचादेखील चौकशी केली.

चौकशी पथकाच्या म्हणण्यानुसार, फॉरेन्सिक अहवाल, मुख्य संशयितांचा जबाब किंवा सुसाइड सीन रिक्रिएट यापैकी कुठल्याही अहवालातून हे हत्येचे प्रकरण असल्याचे सूचित होत नाही. सध्या सीबीआय आत्महत्येच्या दृष्टीकोनातून जास्त लक्ष केंद्रीत करत आहेत. अद्याप या प्रकरणाचा तपास थांबवलेला नाही. या चौकशीतील पुढील महत्त्वाचे घटक म्हणजे एम्स फॉरेन्सिक्स टीमने सादर केलेला अहवाल असून सुशांत सिंग राजपूतच्या पोस्टमार्टम आणि शवविच्छेदन अहवालावर विचार केला जाणार आहे.

Web Title: Sushant Singh Rajput case has no evidence of murder, investigation is underway; Important information of CBI officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.