या इन्स्टाग्राम पोस्टमुळे सिद्धार्थ पिठानी अडकला NCB च्या जाळ्यात, सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी सुरू आहे चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 07:41 PM2021-06-01T19:41:40+5:302021-06-01T19:43:41+5:30

सिद्धार्थच्या अटकेमुळे या मृत्यूप्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळणार आहे.

Sushant Singh Rajput case: Here’s how Siddharth Pithani’s Instagram post helped NCB in arresting him | या इन्स्टाग्राम पोस्टमुळे सिद्धार्थ पिठानी अडकला NCB च्या जाळ्यात, सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी सुरू आहे चौकशी

या इन्स्टाग्राम पोस्टमुळे सिद्धार्थ पिठानी अडकला NCB च्या जाळ्यात, सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी सुरू आहे चौकशी

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वीच त्याचा मित्र आणि रूममेट सिद्धार्थ पठाणीला NCB ने अटक केली आहे.

सुशांत सिंग रजपूतने 14 जून 2020 ला जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. त्याच्या निधनाला पुढील महिन्यात एक वर्षं पूर्ण हाईल. काही दिवसांपूर्वीच त्याचा मित्र आणि रूममेट सिद्धार्थ पिठानीला NCB ने अटक केली आहे.

सिद्धार्थच्या अटकेमुळे या मृत्यूप्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळणार आहे. सिद्धार्थ NCB च्या जाळ्यात कसा अडकला याविषयी तपास अधिकारी समीर वानखेडे यांनी नवभारत टाईम्सला सांगितले आहे. सिद्धार्थ पठाणी गेल्या काही महिन्यांपासून गायब होता. एनसीबीला ऑगस्ट 2020 मध्ये सिद्धार्थ पिठाणीबद्दल माहिती मिळाली होती. सिद्धार्थ हा सुशांतच्या अंत्यसंस्काराच्या वेळी देखील हजर होता. सुशांतच्या निधनानंतर त्याने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करून टाकले होते. आता अलीकडेच त्याने नवीन अकाऊंट सुरू केले होते आणि त्यात तो त्याच्याविषयी पोस्ट टाकत होता.

नवीन अकाऊंटवर एप्रिल महिन्यात त्याने जिममधील काही फोटो शेअर केले होते. त्यासोबतच त्याने आपल्या साखरपुड्याचे फोटो सुद्धा पोस्ट केले होते. फोटो पोस्ट करताना त्याने जिमला टॅग केले होते. यावरून त्याचा जिमचा पत्ता शोधण्यात आला. सिद्धार्थला समन्स सुद्धा बजावण्यात आला होता, पण तो काही उत्तर द्यायला तयार नव्हता. या पोस्टमुळेच त्याचा ठिकाणा लागला.

Web Title: Sushant Singh Rajput case: Here’s how Siddharth Pithani’s Instagram post helped NCB in arresting him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.