Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंग रजपूतच्या स्मृतीदिनाच्या काही दिवस आधी NCB ने केली त्याच्या जवळच्या मित्राला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 13:41 IST2021-05-28T12:14:03+5:302021-05-28T13:41:28+5:30
सुशांत सिंग रजपूतच्या निधनाला पुढील महिन्यात एक वर्षं पूर्ण हाईल. पण या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट हाती आली आहे.

Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंग रजपूतच्या स्मृतीदिनाच्या काही दिवस आधी NCB ने केली त्याच्या जवळच्या मित्राला अटक
ठळक मुद्देएनसीबीने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी असणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.
सुशांत सिंग रजपूतने 14 जून 2020 ला जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. त्याच्या निधनाला पुढील महिन्यात एक वर्षं पूर्ण हाईल. पण या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट हाती आली आहे.
एनसीबीने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी असणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.
एनसीबीने सिद्धार्थ पिठानी या सुशांतच्या मित्राला अटक केली आहे. गेल्यावर्षी सुशांतच्या मृत्यूनंतर सिद्धार्थ पिठानी हे नाव वारंवार समोर आलं होतं. आता पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे. कारण एनसीबीने सिद्धार्थला अटक केली आहे. एनसीबीने सिद्धार्थला हैदराबाद मधून नुकतीच अटक केली आहे.