Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीसोबत हे दहा लोक सीबीआयच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 11:11 AM2020-08-20T11:11:27+5:302020-08-20T11:11:51+5:30

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला दोन महिने उलटले असून आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.

Sushant Singh Rajput Case: These ten people along with Riya Chakraborty are on CBI's radar | Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीसोबत हे दहा लोक सीबीआयच्या रडारवर

Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीसोबत हे दहा लोक सीबीआयच्या रडारवर

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला दोन महिने उलटले असून आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आता सीबीआय बऱ्याच गोष्टींचा तपास करू शकतात. मुंबई पोलिसांना केलेल्या तपासाचा दस्तावेज सीबीआयला द्यावे लागतील आणि त्यांना सहकार्यदेखील करावे लागणार आहे. सीबीआयमध्ये काम केलेल्या माजी अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणी कोर्टाने तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सीबीआय देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन तपास करू शकते. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला सीबीआयच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार आहे.

सीबीआय सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाची सुरूवात त्याच्या फ्लॅटमधील त्याच खोलीत जाऊन क्राइम सीन रिक्रिएट करू शकते. त्याच्या मृत्यूवेळी घरात उपस्थित असलेल्या लोकांचे जबाब नोंदवू शकते. रिया चक्रवर्तीचादेखील जबाब नोंदवला जाईल. तसेच रियाचा भाऊ शौविक, वडील इंद्रजीत आणि इतरांच्या चौकशीसाठी समन्स बजावला जाऊ शकतो. 

रिया चक्रवर्तीसोबत दहा लोक सीबीआय चौकशीच्या रडारवर आहेत. यात रिया चक्रवर्ती शिवाय तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, वडील इंद्रजीत चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, मित्र सिद्धार्थ पिठानी, कुक नीरज, त्याची आधीची मॅनेजर श्रुती मोदी आणि रियाची आई संध्या चक्रवर्ती यांचा समावेश आहे. या लोकांपैकी सिद्धार्थ पिठानी मुंबई सोडून हैदराबादमध्ये राहत आहे. बाकीचे सर्व मुंबईतच आहेत.

चौकशीदरम्यान या लोकांकडे सीबीआयची टीम काही महत्त्वाचे कागदपत्रदेखील मागू शकतात.

Web Title: Sushant Singh Rajput Case: These ten people along with Riya Chakraborty are on CBI's radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.