रिया चक्रवर्ती बेवफा है...! सोशल मीडियावर व्हायरल होतेय 20 रूपयांची नोट, जाणून घ्या काय आहे भानगड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 10:59 AM2020-09-02T10:59:55+5:302020-09-02T11:01:21+5:30
बेवफा सनम...
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर आरोप आणि चौकशीच्या फे-यात अडकलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतेय. सुशांतचे चाहते वेगवेगळ्या पद्धतीने रियाला ट्रोल करत आहेत. आता काहींनी रियाला थेट ‘बेवफा’ म्हटले आहे. एक २० रूपयांची नोट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ‘रिया चक्रवर्ती बेवफा है’, असे या नोटेवर लिहिलेले आहे.
तुम्हाला आठवत असेलच की, काही वर्षांपूर्वी असाच एक मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असे लिहिलेली एक 10 रूपयांची नोट व्हायरल झाली होती. 2016 मध्ये ‘सोनम गुप्ता बेवफा है’ ही नोट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली होती.
अगदी गुगल सर्चच्या यादीत ही नोट तिस-या क्रमांकावर होती. आता ‘रिया चक्रवर्ती बेवफा है,’ असे लिहिलेली 20 रूपयांची नोट तशीच चर्चेत आली आहे. सुशांतच्या मृत्यूसाठी त्याचे चाहते रियाला जबाबदार ठरवत आहेत. याच पार्श्वभूमीवर ही नोट व्हायरल होत आहे.
रिया ही सुशांत प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. सुशांतच्या कुटुंबाने रियाविरोधात बिहार पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. यामुळे तिला रोज टीका व ट्रोलर्सचा सामना करावा लागतोय.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या दु:खातून त्याचे फॅन्स अजूनही सावलेले दिसत नाही. ज्या दिवसापासून सुशांतच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा त्याचे फॅन्स त्याच्या मृत्यू मागच्या कारणाच्या अनेक थेअरीचे अंदाज सोशल मीडियावर लावत आहेत.
एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रिया दावा केला होता की, यूरोप ट्रिपदरम्यान सुशांतची तब्येत बिघडायला सुरूवात झाली होती. पॅरिसमध्ये तीन दिवस तो हॉटेलच्या रूममधून बाहेरही आला नव्हता. रिया असेही म्हणाली होती की, त्यांना ट्रिप मधेच सोडून परतावे लागते होते़ पण यानंतर लगेच सुशांतच्या काही फॅन्सनी काही व्हिडीओ आणि फोटोज शेअर केले होते. ज्यात तो पॅरिसमधील डिज्नीलँडमध्ये फिरताना दिसत आहे.
चौकशीचा ससेमिरा
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, ईडी आणि सीबीआय प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाच्या वकीलांनी केला आहे़