सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने शेअर केली स्पेशल पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 12:30 PM2020-08-19T12:30:30+5:302020-08-19T12:49:46+5:30
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास कोण करणारे याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशनंतर या पुढील तपास आता सीबीआय करणार आहे. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयानं केल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड खुश झाली आहे. अंकिताने लिहिले, न्यायाच्या दिशेने पहिले पाऊल. सत्याचा विजय.
गेल्या अनेक दिवसांपासून सुशांतच्या कुटुंबीयांंनी सीबीआयकडे तपास सोपवण्यात यावा म्हणून सोशल मीडियावर मोहिम सुरु केली होती. त्याच्या मोहिमेला अंकिता लोखंडेनेदेखील पाठिंबा दिला होता.
सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजपा विधेयक नीरज सिंग बबलू यांनी या प्रकरणातील साक्षीदारांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांची हत्या होऊ शकते त्यामुळे त्यांनी पोलीस सुरक्षा द्यावी अशी मागणी केली होती. नीरज सिंग बबलू म्हणाले होते की, सुशांतच्या प्रकरणात दररोज नवीन साक्षीदार येत आहेत जे नवीन तथ्य समोर आणत आहेत. अशा लोकांना आपली माहिती सीबीआयला ही द्यायची आहे. या अशा साक्षीदारांची हत्या होण्याची शक्यता आहे.” मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित करताना, अशी मागणी केली की सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील साक्षीदारांना मुंबई पोलीस सुरक्षा का देत नाही? त्यांनी या साक्षीदारांना सुरक्षा पुरवण्यासाठी मुंबई पोलिसांना विनंती केली आहे.