सुशांत सिंग राजपूतकडे नव्हती पैशांची कमी, सोडून गेला एवढी प्रॉपर्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 11:04 AM2020-06-15T11:04:01+5:302020-06-15T11:04:35+5:30

सुशांतने कमी वेळात कमावली होती इतकी संपत्ती, आकडेवारी आली समोर

Sushant Singh Rajput did not have enough money, he just left the property | सुशांत सिंग राजपूतकडे नव्हती पैशांची कमी, सोडून गेला एवढी प्रॉपर्टी

सुशांत सिंग राजपूतकडे नव्हती पैशांची कमी, सोडून गेला एवढी प्रॉपर्टी

googlenewsNext

मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. सुशांतने त्याच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. त्यानंतर त्याला रुपेरी पडद्यावर खरी ओळख ‘एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून मिळाली.

सुशांतने त्याच्या सिनेइंडस्ट्रीतील कारकीर्दीत मोजक्याच भूमिका केल्या होत्या. मात्र त्याने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. सुशांतला सर्वांत जास्त लोकप्रियता मिळाली २०१६मध्ये प्रदर्शित झालेला बायोपिक ‘एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातून. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित या चित्रपटात सुशांतने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती आणि या चित्रपटातील सुशांतच्या कामाचे खूप कौतुक झाले होते.


सुशांत एका सिनेमासाठी 5 ते 7 कोटी मानधन घेत होता. तर जाहिरातीसाठी तो 1 कोटी रुपये घेत होता. त्याने रिअल इस्टेट प्रॉपर्टी क्षेत्रातही गुंतवणूक केली होती. त्याची एकूण संपत्तीही 80 लाख डॉलर म्हणजे 60 कोटी पेक्षा जास्त होती. एम.एस. धोनी चित्रपटाने 220 कोटींची कमाई केली होती. सुशांतने सिनेमे,जाहिराती आणि गुंतवणुकीतून कोट्यावधीची संपत्ती जमवली होती.



बॉलिवूडच्या इतर सेलिब्रेटीप्रमाणेच सुशांत हा वांद्रे येथील आलिशान घरात राहत होता.

त्याला कार आणि स्पोर्ट्स बाईकचा छंद होता. त्यामुळे त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या होत्या. यात मसेराटी क्‍वाटरोपोर्ते, लँड रोव्हर रेंज रोवर एसयूवी, बीएमडब्‍ल्‍यू के 1300 आर स्पोर्ट बाईक आणि इतर गाड्या होत्या.

Web Title: Sushant Singh Rajput did not have enough money, he just left the property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.