सारा अली खान-सुशांत सिंग राजपूतचे ‘चोरी चोरी चुपके चुपके’!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 10:17 AM2019-02-20T10:17:38+5:302019-02-20T10:18:28+5:30
सारा व सुशांत दोघांनीही ‘केदारनाथ’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा साराचा डेब्यू सिनेमा होता. याच चित्रपटाच्या सेटवर सारा व सुशांतची मैत्री बहरली. आता ही मैत्री बरीच पलीकडे गेल्याचे कळतेय.
सैफ अली खान आणि अमृता सिंगची लाडकी लेक सारा अली खान हिचे लव्ह लाईफ सध्या चर्चेत आहेत. होय, सारा व सुशांत सिंग राजपूत या दोघांचे मैत्रीपलीकडचे प्रेम सध्या चर्चेत आहेत. तुम्हाला ठाऊक आहेच की, सारा व सुशांत दोघांनीही ‘केदारनाथ’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा साराचा डेब्यू सिनेमा होता. याच चित्रपटाच्या सेटवर सारा व सुशांतची मैत्री बहरली. आता ही मैत्री बरीच पलीकडे गेल्याचे कळतेय. इतकी की, सुशांतच्या बर्थ डेसाठी साराने तिची हॉलिडे ट्रिप अर्धवट सोडली. बर्थ डेच्या दिवशी सुशांतसोबत राहता यावे म्हणून, ती गेली तशी परत आली. आता तर साराला रोज जिममध्ये सोडण्याचा जिम्मा सुशांतने आपल्या खांद्यावर घेतलाय म्हणे.
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांत अगदी रोज साराला जिममध्ये सोडूल देतो. ते सुद्धा मीडियाचा डोळा चुकवत. होय, जिमबाहेर मीडियाच्या कॅमे-यांच्या नजरा चुकवण्यासाठी तो साराला जिमच्या गेटबाहेर न सोडता, जिमपासून काही दूर अंतरावर सोडतो. तूर्तास सुशांत व साराने आपले नाते मान्य केलेले नाही. आम्ही केवळ मित्र आहोत, असे दोघेही सांगताहेत. पण असे असले तरी त्यांची ही लपवाछपवी बरेच काही सांगणारी आहे.
सारा व सुशांतचा ‘केदारनाथ’ बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नव्हता. पण यातील साराच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. तिचे काम बघून ‘केदारनाथ’चे दिग्दर्शक अभिषेक कपूर स्वत: इतके प्रभावित झाले होते की, त्यांनी रोहित शेट्टीला ‘सिम्बा’साठी तिचे नाव सुचवले होते. लवकरच साराच्या नव्या चित्रपटाची घोषणा होऊ शकते. सुशांतचे म्हणाल तर सुशांतकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. त्याचा ‘सोन चिरैय्या’ लवकरच प्रदर्शित होणार आहे.