सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्तीला शोकसभेत सामील होण्यास दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 07:54 PM2020-06-19T19:54:01+5:302020-06-19T19:59:05+5:30
सोमवारी सुशांतच्या कुटुंबीयांकडून एका शोकसभेचे आयोजन केले आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. शांतच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्यापसमोर आलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे. सोमवारी सुशांतच्या कुटुंबीयांकडून एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार या शोकसभेत कुटुंबीयांनी रिया चक्रवर्तीला सामील होण्यास परवानगी नाकारली आहे. कुटुंबीय रियासोबत कंम्फर्टेबल नसल्यामुळे त्यांनी नकार दिल्याचा समजतो आहे.
रिया व सुशांत कार्टर रोडस्थित पेंटहाऊसमध्ये राहत होते. येथे सुशांतचा मित्रही त्यांच्यासोबत राहायचा. सुशांतच्या निधनाच्या काही दिवस आधी रियाने हे घर सोडले होते. पोलिसांना ही गोष्ट खूप खटकली. याबद्दल विचारले असता तिने सांगितले की, सुशांतचे घर सोडण्यापूर्वी दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते. या भांडणानंतरचे एकमेकांना केलेले मॅसेजही तिने पोलिसांना दाखवले. या भांडणानंतर दोघांमध्ये फोनवर बोलणे झाले होते, हेही तिने सांगितले.
पिंकविलाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत याबद्दल माहिती दिलीय. या वृत्तानुसार, सर्वप्रथम रियाला सुशांतसोबतचे तिचे संबंध आणि लग्नाबद्दल विचारले गेले. यादरम्यान पोलिसांनी दोघांमधील मॅसेज दाखवायला सांगितले. तिचा मोबाईल स्कॅन करण्यात आला. सुशांत व मी लवकरच घर घेणार होतो आणि 2020 च्या अखेरपर्यंत लग्न करण्याचा आमचा विचार होता़, असे रियाने यावेळी पोलिसांना सांगितल्याचे कळते.