Sushant Singh Rajput Case: "सुशांत प्रकरणाचा तपास भरकटतोय; दररोज केवळ सेलिब्रिटींची फॅशन परेड सुरू"
By कुणाल गवाणकर | Published: September 25, 2020 08:37 PM2020-09-25T20:37:25+5:302020-09-25T20:40:38+5:30
सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांच्याकडून नाराजी व्यक्त
मुंबई: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास वेगळ्याच दिशेला नेला जात असल्याची त्याच्या कुटुंबियांची भावना आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण लक्ष केवळ ड्रग प्रकरणावर केंद्रीत करण्यात आलं आहे. सीबीआयनं तपास हाती घेतल्यापासून एकदाही पत्रकार परिषद घेतलेली नाही. त्यांच्या तपासाचा वेगही समाधानकारक नाही, अशा शब्दांत सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी तपासाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
सुशांत प्रकरणात बऱ्याच दिवसांपासून तपास सुरू आहे. मात्र तपासातून अद्याप काहीच स्पष्ट झालेलं नाही, अशा शब्दांत विकास सिंह यांनी विविध यंत्रणांकडून सुरू असलेल्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मुंबई पोलिसांप्रमाणेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोदेखील (एनसीबी) केवळ सेलिब्रिटींची फॅशन परेड करत आहेत, असं सिंह म्हणाले.
Today, we are helpless as we don't know which direction the case is going in. Till today, CBI has not done a press briefing on what they have found out. I'm not happy with the speed at which the case is going: Vikas Singh, lawyer of the father of Sushant Singh Rajput https://t.co/qyBzzdDFbh
— ANI (@ANI) September 25, 2020
होय, मीच रियासोबत ड्रग्जबद्दल चॅट केलं, पण...; रकुल प्रीतकडून ब्लेमगेम सुरू?
सुशांत प्रकरणाच्या तपासाचा वेग संथ आहे. मुंबई पोलिसांपाठोपाठ एनसीबीनंदेखील निराशा केली आहे. एनसीबी दररोज बॉलिवूड कलाकारांना बोलावत आहेत. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती ड्रग्ज सिंडिकेटचा भाग असल्यास तिच्यावर गंभीर कलमं दाखल व्हायला हवीत, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
रिया चक्रवर्तीने NCBच्या चौकशीत नाही घेतले कोणत्याच बॉलिवूड सेलिब्रेटीचे नाव, सतीश मानशिंदेंचा दावा
सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी खरेदी करायचे याची कबुली रियानं दिली आहे. पण ती स्वत: ड्रग्ज खरेदी करायची की सुशांतच्या सांगण्यावरून करायची? सुशांतला कशा पद्धतीनं ड्रग्ज दिलं जायचं? चहा-कॉफीमधून दिलं जायचं का? असे प्रश्न आम्हाला पडतात. सुशांत जीवंत नसल्यानं रिया आता काहीही दावे करू शकते. ती खरं सांगेलच असं नाही. ती काहीही सांगू शकते. १० जणांची नावं घेऊ शकते, असं विकास सिंह म्हणाले.
सीबीआयनं एम्सच्या पथकाची भेट का घेतली नाही?
सुशांतचे काही फोटो दाखवून एम्सच्या एका डॉक्टरांनी ही आत्महत्या नव्हे, तर हत्याच असल्याचं मला सांगितलं होतं. एम्सच्या डॉक्टरांच्या पथकाची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी भेट घ्यायला हवी होती. पण सीबीआयचे अधिकारी एम्सच्या पथकाला का भेटले नाहीत? सीबीआय या प्रकरणाचा तपास खूनाच्या दिशेनं का करत नाही?, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.