अखेर झाला खुलासा, या अभिनेत्यालाआत्महत्येपूर्वी सुशांत सिंग राजपूतने केला होता अखेरचा फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 12:32 PM2020-06-15T12:32:43+5:302020-06-15T12:37:52+5:30
सुशांतच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने रविवारी वांद्रे येथील त्याच्या घरात आत्महत्या केली. 34 वर्षांच्या सुशांतच्या निधनाची बातमी ऐकताच संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सुशांतच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार सुशांतने रविवारी सकाळी 9.30 ला बहिणीला फोन केला होता. त्यानंतर त्याने आपला मित्र महेश शेट्टीला फोन केला. सुशांत आणि महेशने 'किस देश में है मेरा दिल' या मालिकेत एकत्र काम केले आहे. या मालिकेतून सुशांतने टीव्ही जगतात पाऊल ठेवले होते.
महेश शेट्टी हा सुशांतचा अत्यंत जवळचा मित्र होता त्याला भावासारखा मानायचा. दोघांनी एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' आणि 'किस देश में है मेरा दिल' या दोन मालिकेत एकत्र झळकले. दोघांची मैत्री याठिकाणी घट्ट झाली.
मे महिन्यात सुशांतने महेशच्या वाढदिवसाला त्याच्यासोबतचा सोशल मीडियावर फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. 'हॅप्पी बर्थ डे मेरी जान' असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले होते. रिपोर्टनुसार सुशांतच्या निधानानंतर पोलिस महेश शेट्टीचा जबाब नोंदवणार आहे.
सुशांतने त्याच्या सिनेइंडस्ट्रीतील कारकीर्दीत मोजक्याच भूमिका केल्या होत्या. मात्र त्याने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. सुशांतला सर्वांत जास्त लोकप्रियता मिळाली २०१६मध्ये प्रदर्शित झालेला बायोपिक ‘एम.एस.धोनी द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातून. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित या चित्रपटात सुशांतने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती आणि या चित्रपटातील सुशांतच्या कामाचे खूप कौतुक झाले होते.