अभिनेता सुशांत सिंग राजपूत अनंतात विलीन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 05:07 PM2020-06-15T17:07:16+5:302020-06-15T17:11:23+5:30
सुशांत सिंग राजपूतवर याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.
सुशांत सिंग राजपूतवर याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. सुशांत सिंग राजपूत अनंतात विलीन झाला आहे. कोविड 19च्या प्रोटोकॉलनुसार 20 पेक्षा जास्त लोकांना सुशांतच्या अंतिम यात्रेत परवानगी देण्यात आली नव्हती. अंतिम संस्कारा विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत सुशांतचे संपूर्ण कुटुंबीय आणि अभिनेत्री क्रिती सॅनन आणि श्रद्धा कपूर आणि गायक उदित नारायण उपस्थित होते. सुशांतचे वडिल आणि चुलत भाऊ सकाळीच पटाणावरुन मुंबईत आले आहेत.
सुशांतच्या आत्महत्येच्या बातमी ऐकून सर्वजण स्तब्ध झाले आहेत. पाटणा ते मुंबई सुशांतचा प्रवास अविश्वनिय होता. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेल्या सुशांतने तिसऱ्या वर्षात इंजिनिअरिंग सोडून अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सुशांतच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुशांत नैराश्यात गेल्याची माहिती समोर येते आहे. त्यावर तो उपचारदेखील घेत होता. मात्र तरीदेखील सुशांतने टोकाचं पाऊल उचलून आपली जीवन यात्रा संपवली.
सुशांतला 2008 मध्ये टीव्हीवर पहिला ब्रेक बालाजी टेलीफिल्म्सचा शो 'किस देश में है मेरा दिल'मध्ये मिळाला. परंतू, त्याला खरी ओळख 2009 ते 2011 दरम्यान आलेली मालिका 'पवित्र रिश्ता'मधून मिळाली. साचेबद्ध काम करण्यात रस नसून वेगळे काहीतरी करण्याच्या प्रयत्न करणा-यापैकी सुशांत होता. त्यानंतर सुशांतला 2013 मध्ये बॉलिवूडचा पहिला चित्रपट 'काई पो छे' मिळाला. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. या चित्रपटानंतर शुद्ध देसी रोमान्स या सिनेमात तो झळकला. पण बॉलिवूडमध्ये त्याला खरी ओळख दिली ती ‘एम एस धोनी-अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाने. या सिनेमात त्याने भारताचा माजी क्रिकेट कर्णधार एम. एस. धोनीची भूमिका साकारली होती. त्याने धोनीची भूमिका पडद्यावर अशी काही जिवंत केली की, या सिनेमाने इतिहास रचला. हा सुशांतचा पहिला सुपरडुपर हिट सिनेमा होता. या चित्रपटानंतर ‘केदारनाथ’ या सिनेमात तो सारा अली खानसोबत दिसला होता. सोनचिडीया, छिछोरे या सिनेमातही त्याने काम केले होते.