‘छिछोरे’चा ट्रेलर पाहून नेटकरी म्हणाले, ‘गरीबों का स्टुडंट ऑफ द इअर’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 02:34 PM2019-08-04T14:34:08+5:302019-08-04T14:35:43+5:30

आज फ्रेन्डशिप डेच्या मुहूर्तावर ‘छिछोरे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. कॉलेजच्या दिवसांतील मैत्रीची कथा सांगणा-या या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत, श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये आहेत.

sushant singh rajput shraddha kapoor film chichore trailer out social media reaction | ‘छिछोरे’चा ट्रेलर पाहून नेटकरी म्हणाले, ‘गरीबों का स्टुडंट ऑफ द इअर’ 

‘छिछोरे’चा ट्रेलर पाहून नेटकरी म्हणाले, ‘गरीबों का स्टुडंट ऑफ द इअर’ 

googlenewsNext
ठळक मुद्दे या चित्रपटात कॉलेजातील तीन मित्रांची कथा रेखाटण्यात आली. यात दोन समांतर कथा पाहायला मिळतीय.

आज फ्रेन्डशिप डेच्या मुहूर्तावर ‘छिछोरे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. कॉलेजच्या दिवसांतील मैत्रीची कथा सांगणा-या या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत, श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये आहेत. ‘छिछोरे’चा ट्रेलर पाहून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींना हा ट्रेलर आवडला तर काहींनी ‘गरीबों का स्टुडंट ऑफ द इअर’ असे या ट्रेलरचे वर्णन केले.

चित्रपटात फक्त बोमन इराणी तेवढे मिसींग आहेत, असे म्हणत काहींनी या चित्रपटाला ‘3 इडियट्स’ची कॉपी म्हटले आहे. तूर्तास या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला किती आणि कसा प्रतिसाद मिळतो ते बघूच.




  नीतेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा व सुशांत यांचा या चित्रपटात डबल रोल आहे. याशिवाय वरूण शर्मा, प्रतिक बब्बर यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या चित्रपटात आमिर खान कॅमिओ करताना दिसणार आहे. सन २०१६ मध्ये प्रदर्शित नीतेश तिवारींच्या ‘दंगल’ चित्रपटाने बॉक्सआॅफिसवरचे सगळे रेकॉर्ड तोडले होते. या चित्रपटानंतर नीतेश तिवारी ‘छिछोरे’ हा चित्रपट घेऊन येत आहेत.




 या चित्रपटात कॉलेजातील तीन मित्रांची कथा रेखाटण्यात आली. यात दोन समांतर कथा पाहायला मिळतीय. एक म्हणजे कॉलेजच्या दिवसांतील आणि दुसरी म्हणजे, म्हातारपणीची. येत्या 6 सप्टेंबरला  हा चित्रपट प्रदर्शित होतोय.
 

Web Title: sushant singh rajput shraddha kapoor film chichore trailer out social media reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.