सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीचा बोल्ड फोटो पाहून नेटकरी भडकले, झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 17:22 IST2021-12-17T17:22:21+5:302021-12-17T17:22:49+5:30
आपल्या भावाला न्याय मिळावा, अशी मागणी करत Sushant SinghRajputची बहिण श्वेता किर्ती सिंगने अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या. तूर्तास हीच सुशांतची बहीण चर्चेत आहे. पण एका वेगळ्या कारणाने...

सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीचा बोल्ड फोटो पाहून नेटकरी भडकले, झाली ट्रोल
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant SinghRajput ) आज आपल्यात नाही. पण चाहते अजूनही त्याच्या आठवणीने हळवे होतात. आजही अनेक चाहते सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी झटत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर मोठी मोहिम सुरू केली होती. सुशांतची बहिण श्वेता किर्ती सिंग (Shweta Singh Kirti) हिने सुद्धा या मोहिमेत सक्रीय सहभाग घेतला होता. आपल्या भावाला न्याय मिळावा, अशी मागणी करत तिने अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या. तूर्तास हीच सुशांतची बहीण चर्चेत आहे. पण एका वेगळ्या कारणाने. होय, श्वेताने स्वत:चा एक फोटो शेअर केला आणि लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
होय, सुशांतचे चाहते तिच्यावर नाराज आहेत. श्वेताने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर बीचवरचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. यात ती मरून कलरच्या ब्रालेटमध्ये दिसतेय. श्वेताचा हा बोल्ड फोटो पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी राग व्यक्त श्वेताला सुशांतची आठवण करून दिली. असे फोटो शेअर करण्यापेक्षा सुशांतच्या केसवर लक्ष दे, असा सल्ला काही नेटकऱ्यांनी तिला दिला.
अलीकडे श्वेताने सुशांतची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
सुशांतची बहीण श्वेता ही अमेरिकेत राहते. लहानपणापासून मॉडेलिंग आणि फॅशनकडे तिचा कल होता. त्यामुळे चेन्नईतून तिने फॅशन डिझाईनिंगचा कोर्स केला आणि नंतर यात ग्रॅज्युएशन करण्यासाठी ती कॅलिफोर्नियाला गेली. सध्या ती एक बिझनेसवुमन म्हणून ओळखली जाते. कॅलिफोर्नियात तिने मुलांसाठी एक नर्सरी स्कूल सुरू केले आहे. 2007 मध्ये किर्तीने विशाल किर्तीसोबत लग्नगाठ बांधली होती. यानंतर दोघंही कॅलिफोर्नियाला स्थायिक झाले होते. दोघांना एक मुलगा व एक मुलगी आहे.