सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण, मुंबई पोलिसांच्या हाती लागले हे पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 12:47 PM2020-06-18T12:47:22+5:302020-06-18T12:47:57+5:30

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी पोलीस तपास करत असून आता त्याच्या हाती काही पुरावे लागल्याचे समजते आहे.

Sushant Singh Rajput suicide case took a different turn, Mumbai Police got new evidence | सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण, मुंबई पोलिसांच्या हाती लागले हे पुरावे

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण, मुंबई पोलिसांच्या हाती लागले हे पुरावे

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. त्याने वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागे कोण जबाबदार आहे, यावरून सोशल मीडियावर नेपोटिझमला विरोध होताना पहायला मिळाला. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नसून पोलीस तपास करत आहेत. त्यात आता पोलिसांच्या हाती काही पुरावे लागल्याचे समजते आहे.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांना कोणतीच सुसाइड नोट मिळाली नाही पण असे समजतंय की त्याच्या घरातून पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, पोलिसांना सुशांतच्या घरात त्याच्या पाच खासगी डायरीज मिळाल्या आहेत. या डायरीत लिहिलेल्या गोष्टींनुसार चौकशी केली जाणार आहे. या डायरीच्या माध्यमातून पोलीस त्याच्या आत्महत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार सुशांत डायरीमध्ये पुस्तकांमध्ये वाचताना त्याला महत्त्वाच्या वाटलेले कोट लिहून ठेवत होता. सुशांतच्या डायरीनुसार काही जवळच्या लोकांची चौकशी होऊ शकते.


सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची देखील चौकशी करण्यात आली आहे. तिला मदतीसाठी बोलवण्यात आले आहे. असेही सांगितले जात आहे की या प्रकरणात सुशांतचा कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रादेखील चौकशीसाठी मदत करतो आहे. टाइम्सच्या रिपोर्टनुसार प्राथमिक चौकशीत पोलिसांच्या निदर्शनास आले आहे की सुशांतकडे कामाची कमतरता असल्यामुळे त्याने हे पाऊल उचलले आहे. मात्र अजून बऱ्याच गोष्टींचा तपास व चौकशी सुरू आहे.


सुशांतच्या निधनानंतर इंडस्ट्रीत जबरदस्त युद्ध रंगलेले पहायला मिळत आहे. एकीकडे इंडस्ट्रीतील घराणेशाहीला जबाबदार ठरवले जात आहे तर दुसरीकडे त्याच्या खासगी आयुष्याला जबाबदार ठरवले जात असल्याचं पहायला मिळतंय. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना सांगितले की, व्यावसायिक कारणामुळे त्याच्यावर तणाव आला का? या दृष्टीनेही पोलीस तपास करणार आहेत.

Web Title: Sushant Singh Rajput suicide case took a different turn, Mumbai Police got new evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.