सुशांत गरीबांच्या मदतीसाठी तयार करत होता मोबाइल App, डेन्मार्कच्या बिझनेसमनने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 10:14 AM2020-09-12T10:14:46+5:302020-09-12T10:21:23+5:30
रोमलने आयएनएस न्यूज एजन्सीला सांगितले की, सुशांत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा AI चा वापर करून भारतातील गरीबांची मदत करण्याचा प्लॅन करत होता.
सुशांत सिंह राजपूत आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित एक मोबाइल अॅप डेव्हलप करत होता. ही माहिती डेन्मार्क येथील सिंह-आंत्रपेन्योर एरियन रोमलने दिली आहे. हे अॅप सुशांत गरीबांच्या मदतीसाठी तयार करत होता. रोमलने सुशांतसोबत एका पार्टीचाही उल्लेख केलाय. जिथे त्याने दारू पिण्यास मनाई केली होती. सांगितले की, त्याच्या डाएटबाबत तो फार स्ट्रीक्ट होता.
रोमलने केला प्रश्न - २०२० पर्यंत बनलं असेल, कुठंय अॅप?
रोमलने आयएनएस न्यूज एजन्सीला सांगितले की, सुशांत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा AI चा वापर करून भारतातील गरीबांची मदत करण्याचा प्लॅन करत होता. त्यांनी सांगितले की, गेल्यावर्षी मुंबईक मार्च किंवा एप्रिल दरम्यान शेवटचा तो सुशांतला भेटला होता. त्यावेळी आमच्यात टेक्नॉलॉजीचीबाबत चर्चा झाली होती.
त्याने एक मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलप करण्याचा प्लॅन केला होता. २०२० पर्यंत त्यांनी महत्वाची काही तयारही केलं असेल. ते कुठंय? तो AI चा वापर करून काही तयार करण्याचा प्लॅन करत होता. ज्यातून भारतातील गरीबांना मदत मिळाली असती. त्याने यावर चर्चा केली होती. पण जास्त खुलासा केला नव्हता. कारण ही त्याची संकल्पना होती आणि ती चोरी होण्याची भीती होती. पण त्याने मला कॉन्सेप्ट सांगितली होती.
ड्रग्स अॅडिक्ट असू शकत नाही सुशांत
रोमलने सांगितले की, काही लोक असे असतात जे तुमच्या छाप सोडतात. तो त्यापैकीच एक होता. मी अॅप्स बनवण्याच्या कामात आहे. त्यामुळे मला त्याची संकल्पना फार इंटरेस्टींग वापरली होती. तो वेगळा माणूस होता. एखाद्या अभिनेत्याकडे इतकं नॉलेज असणं फारच हैराण करणारी बाब आहे. एरियन काही वर्षांपासून भारतात येतोय. त्याने काही हिंदी गाणी कंपोज आणि प्रोड्यूस केली आहेत. त्यांचं मत आहे की, सुशांतला जेवढं पाहिलं तो ड्रग अॅडिक्ट वाटत नाही. तो म्हणाला की, त्याच्या मृत्यूमागे दुसरं काही रहस्य आहे जे समोर यायला पाहिजे.
पार्टीत घेऊन आला होता टिफिन, प्यायला नव्हता दारू
रोमल ४ वर्ष जुनी गोष्ट आठवत म्हणाला की, मी बाहेर असतो. पण अनेक वर्षेआधी मी त्याला भेटलो होतो. त्यावेळी तो मालाडमध्ये राहत होता. तेव्हा मी त्याला पहिल्यांदाच भेटलो होतो आणि ती काही टेलिव्हिजन कलाकारांची पार्टी होती. मी ड्रिंक घेऊन सुशांतच्या बाजूला बसलो होतो. मला त्यावेळी माहीत नव्हतं की, तो कोण आहे. मी त्याला असंच विचारलं भाई तुझं ड्रिंक कुठे आहे? तो म्हणाला होता की, 'नाही, मी माझं डाएट मील घेत आहे'. तो त्याचा टिफिन बॉक्स घेऊन आला होता. ज्यात बॉइल्ड चिकन होतं. तो तिथे डाएट मील खाणारा एकटा व्यक्ती होता. बाकी सगळे लोक ड्रिंग घेत होतो, एन्जॉय करत होते. मी फोर्स करूनही त्याने ड्रिंक घेतलं नव्हतं. तो म्हणाला होता की, याने त्याच्या रोलच्या तयारीवर परिणाम होईल. मला तेव्हाच लक्षात आलं होतं की, हा माणूस आपलं काम आणि डिसिप्लिनचा पक्का आहे.
हे पण वाचा :
सुशांतच्या घरून रियाने स्वतःच्या घरी कुरिअर केला होता अर्धा किलो गांजा, कारण...!
'सुशांतचे अंत्यसंस्कार होते बर्थडे पार्टी नाही...', संदीप सिंगने रियावर साधला निशाणा
Shocking!! 13 जूनच्या रात्री ‘डार्क वेब’द्वारे झाले होते सुशांतच्या हत्येचे लाईव्ह टेलिकास्ट?