नवाजुद्दीन सिद्दीकी नाही झळकणार सुशांत सिंग राजपूतच्या 'चंदा मामा दूर के मध्ये ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 09:04 AM2017-08-30T09:04:13+5:302017-08-30T14:35:28+5:30

सुशांत सिंग राजपूत चा चंदा मामा दूर के हा चित्रपट सध्या फार चर्चेचा विषय आहे. सुशांत सिंग राजपूतने घेतलेली ...

Sushant Singh Rajput's 'Chanda Mama' away from Nawazuddin Siddiqui? | नवाजुद्दीन सिद्दीकी नाही झळकणार सुशांत सिंग राजपूतच्या 'चंदा मामा दूर के मध्ये ?

नवाजुद्दीन सिद्दीकी नाही झळकणार सुशांत सिंग राजपूतच्या 'चंदा मामा दूर के मध्ये ?

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small;">सुशांत सिंग राजपूत चा चंदा मामा दूर के हा चित्रपट सध्या फार चर्चेचा विषय आहे. सुशांत सिंग राजपूतने घेतलेली नासाला जाऊन घेतलेली ट्रेनिंग त्यानंतर आर माधवन सुद्धा नासामध्ये जाऊन ट्रेनिंग घेणार आहे. अशा वेगवेगळ्या चर्चांमुळे चित्रपट चर्चेचा विषय ठरले आहे. या सगळ्या गोष्टींनी चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. ह्या चित्रपटात मोठी कलाकार मंडळी निवडली आहे त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची वाट मोठ्या आतुरतेने  पाहात आहेत.  सुशांतसिंग राजपूत यात मुख्य भूमिका साकारणार आहे आणि त्याच्या बरोबर नवाजुद्दीन सिद्धीकी आणि आर माधवन ह्यांची सुद्धा यात महत्वाची भूमिका आहे असे नुकतेच घोषित करण्यात आले.
 
याच काळात नवाजुद्दीनचा बाबूमोशय बंदुकबाज हा चित्रपट सध्य थिएटर मध्ये धमाल उडवत आहे. या चित्रपटाची लोकप्रियता बघता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गल्ला जमवण्याची शक्यता आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नवाजुद्दीन शी बोलताना त्याला आगामी चित्रपट चंदा मामा दूर के या चित्रपटासाठी आर माधवन नंतर आता तू सुद्धा का नासा मध्ये ट्रेनिंग घेणार का? असे विचारले असता त्याचे उत्तर विचारात टाकण्यासारखे होते. नवाज म्हणाला मी अशा कोणत्या चित्रपटाचा भाग आहे हे मलाच माहिती नाही. पुढे तो म्हणाला चित्रपटांच्या निर्मात्यांशी माझे बोलणे झालेले नाही की मी या चित्रपटात काम करणार आहे की नाही. मी अजून अधिकृतरित्या हा चित्रपट साईन केलेला नाही. 

Web Title: Sushant Singh Rajput's 'Chanda Mama' away from Nawazuddin Siddiqui?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.