सुशांतच्या निधनानंतर दुःखातून सावरते अंकिता लोखंडे, 'या' व्यक्तीने दिला तिला आधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 19:16 IST2020-08-27T19:08:42+5:302020-08-27T19:16:39+5:30
सुशांत आणि अंकितानं एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. शोमध्ये ही जोडी हिट तर झालीच पण सेटवरील त्यांची मैत्री प्रेमात बदलली. अनेक वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केलं काही वर्ष ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते

सुशांतच्या निधनानंतर दुःखातून सावरते अंकिता लोखंडे, 'या' व्यक्तीने दिला तिला आधार
सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर जगासमोर अंकिता खूश असल्याचे दाखवत होती. पण तिची छोटी बहिण ज्योतीला तिची अवस्था समजली होती. या ब्रेकअपमधून सावरण्यासाठी काही काळ ज्योती बहिण अंकितासोबत तिच्या सावलीसारखी उभी राहिली.तिला आधार देत त्यातूनही तिला बाहेर काढले. सुशांत सिंगनंतर अंकिता पुन्हा एकदा प्रेमात पडली आणि यावेळी नुसते प्रेमच नाही तर लग्न करण्याचा निर्णय तिने घेतला होता म्हणूनच विकी जैनची जीवनसाथी म्हणून निवड तिने केली होती.अंकिताने आणि विकीच्या नात्याबद्दल उघडपणे बोलले नसले तरी विकी आणि अंकिता लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहेत.
त्यानंतर विक्की बॉक्स क्रिकेट लीगचा मुंबई टीमचा सहमालक आहे.दोघेही एकमेकांसोबतच्या नात्याबाबत सीरियस आहेत. दोघेही एकाच सोसायटीमघ्ये राहतात आणि एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईमही घालवतात.इतकेच नाही तर लॉकडाऊनमध्ये अंकितान साखरपुडा उरकल्याचा बोलले जात आहे. तिच्या बोटातली अंगठी पाहिल्यावर उलट सुलट चर्चा रंगल्या.
सुशांतच्या मृत्यूने अंकिताला जबर धक्का बसला. त्यामुळे त्याच्या जाण्याने पुन्हा अंकिता कोलमडून गेली. ती जगासमोर जरी सशक्त महिला म्हणून समोर आली असली तरी तिला सुशांतच्या आठवणीमुळे ती खचून गेली होती. मात्र तिच्या या कठिण काळात तिला विकी जैनने खरा आधार दिला. त्याच्यामुळेच आज पुन्हा अंकिता सुशांतच्या आठवणीतून स्वतःला सावरू लागली आहे. अंकिता कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यानंतर तिनं टायगर श्रॉफ, दिशा पाटनी आणि रितेश देशमुख यांच्यासोबत ‘बागी 3’ मध्ये दिसली होती.