​सुशांत सिंह राजपूतच्या ‘रोमियो अकबर वॉल्टर’चे फर्स्ट लूक पाहाच!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2017 04:42 AM2017-03-27T04:42:41+5:302017-03-27T11:56:44+5:30

सुशांत सिंह राजपूत पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांसाठी धम्माल बातमी घेऊन आला आहे. होय, सुशांतचा ‘रोमियो अकबर वॉल्टर’ हा चित्रपट ...

Sushant Singh Rajput's first look of 'Romeo Akbar Walter' !! | ​सुशांत सिंह राजपूतच्या ‘रोमियो अकबर वॉल्टर’चे फर्स्ट लूक पाहाच!!

​सुशांत सिंह राजपूतच्या ‘रोमियो अकबर वॉल्टर’चे फर्स्ट लूक पाहाच!!

googlenewsNext
शांत सिंह राजपूत पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांसाठी धम्माल बातमी घेऊन आला आहे. होय, सुशांतचा ‘रोमियो अकबर वॉल्टर’ हा चित्रपट येतोय. या चित्रपटाबद्दल सुशांतने त्याच्या सोशल अकाऊंटवरून माहिती दिली. या चित्रपटाचा फर्स्ट लूक सुशांतने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या चित्रपटाचे दोन पोस्टर त्याने पोस्ट केले आहेत. या दोन्ही पोस्टरवर सुशांत दिसतो आहे. ही पोस्टर पाहून ‘रोमियो अकबर वॉल्टर’ला १९७१ ची पार्श्वभूमी असल्याचे तुम्हाला कळून येईल. या पोस्टरमधील सगळ्यात खास गोष्ट म्हणजे, यातील टॅगलाईन. ‘अवर हिरो? देअर स्पाई??’(आमचा हिरो, त्यांचा हेर) अशी टॅगलाईन यावर आहे. हा चित्रपट सत्यकथेवर आधारित असल्याचा दावा केला गेला आहे.



ALSO READ : SHOCKING !! ​अंकितानंतर क्रिती सॅननसोबतही सुशांतसिंह राजपूतचे ब्रेकअप!

  या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, रॉबी गरेवाल यांनी. तेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यापूर्वी ते ‘व्हेन टाइम स्ट्राइक्स’,‘एम पी3: मेरा पहला पहला प्यार’ आणि ‘आलू चाट’ सारखे चित्रपट बनवून चुकले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे.



खरे तर सुशांतच्या चित्रपटाचे हे दोन पोस्टर्स पाहून आपल्याला इमरान हाश्मी याच्या आगामी ‘कॅप्टन नवाब’च्या पोस्टरची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कारण इमरानच्या या आगामी चित्रपटाच्या पोस्टरवरही असेच काहीसे लिहिलेले आपण पाहिले होते. या पोस्टरमध्ये इमरान हाश्मी अर्धा पाकिस्तानी लष्कराचा पोशाख आणि अर्धा भारतीय लष्कराच्या पोशाखात दिसला होता. या पोस्टरची टॅगलाईन होती ‘टू नेशन, वन सोल्जर’ अशी. एकंदर काय तर दोन्ही चित्रपटांच्या कथा वेगवेगळ्या असल्या तरी त्याच्या पोस्टरमधील साम्य दुर्लक्षून चालणार नाही.

 

Web Title: Sushant Singh Rajput's first look of 'Romeo Akbar Walter' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.