सुशांतची मॅनेजर श्रुति मोदीने रडत-रडत सीबीआयसमोर उघड केली सगळी गुपितं, म्हणाली - मला माहीत होतं....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 11:49 AM2020-09-03T11:49:34+5:302020-09-03T11:50:06+5:30
ताज्या माहितीनुसार सीबीआयचे प्रश्न ऐकून श्रुति मोदी ढासळली आणि रडत रडत सगळी गुपितं उघडली. श्रुति मोदीने सीबीआयसमोर सांगितले की, सुशांत सिंह राजपूतच्या घरी नेहमीच पॅकेट्स येत होते.
सीबीआय टीम सुशांत सिंह राजपूतशी संबंधित लोकांची चौकशी करत आहे. सीबीआय हाती ही केस येऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस झाले. पण त्यांच्या हाती सुशांतची हत्या झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे लागले नाहीत. ईडीनंतर सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर श्रुति मोदीची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. ताज्या माहितीनुसार सीबीआयचे प्रश्न ऐकून श्रुति मोदी ढासळली आणि रडत रडत सगळी गुपितं उघडली. श्रुति मोदीने सीबीआयसमोर सांगितले की, सुशांत सिंह राजपूतच्या घरी नेहमीच पॅकेट्स येत होते.
श्रुति मोदीने रडत रडत सगळं काही सांगितलं. ती म्हणाली की, सुशांत सिंह राजपूतच्या घरी नेहमीच पांढऱ्या रंगांचे पॅकेट्स येत होते आणि एका मॅनेजर प्रमाणे ती पॅकेट्स रिसीव्ह करून पुढे देत होती. इतकेच नाही तर मोदीने सांगितले की, जेव्हा तिने या पॅकेट्सबाबत विचारले तर तिला ते प्रिमिअम टोबॅको असल्याचे सांगण्यात आले. पण नंतर जशी श्रुतिला याची शंका आली की, या पॅकेट्समध्ये ड्रग्स येतात तर तिने सुशांतच्या घरी काम करण्यास नकार दिला होता.
श्रुति मोदीने सुशांत सिंह राजपूतच्या घरी जुलै २०१९ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत काम केलं होतं. फेब्रुवारीमध्ये रिया चक्रवर्तीनेच श्रुति मोदीला काम करण्यास मनाई केली होती.
नंतर दिशा सालियनने सांभाळलं होतं काम
रिया चक्रवर्ती म्हणाली होती की, श्रुति मोदीच्या पायात जखम झाल्यावर तिला सुट्टीवर पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर दिशा सालियनने सुशांत सिंह राजपूतचं काम सांभाळलं होतं. सध्या श्रुति मोदीने ज्या ज्या गोष्टी सीबीआयसमोर सांगितल्या आहेत त्याद्वारे केस आणखी मजबूत झाली आहे.
श्रुतिच्या वकिलांनी केला होता दावा
सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीचे वकील अशोक सरावगीने रोज नवे खुलासे करतायेत. या प्रकरणातील ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर अशोक यांनी दावा केला आहे की, एका प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा सुशांत आणि रिया चक्रवर्तीला ड्रग्सचा पुरवठा करायचा.
न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, श्रुती मोदीचे वकील अशोक सरावगीने यांनी सांगितले त्या व्यक्तीचे नाव इम्तियाज खत्री आहे. आमदार राम कदम यांनीसुद्धा याआधी या व्यक्तीचे नाव घेतले होते. पुढे ते म्हणाले, जर हा तोच इम्तियाज खत्री असेल तर तो या प्रकरणात सगळ्यात मोठा क्लू ठरु शकतो. याचे धागेदार बॉलिवूडशीदेखील जोडलेले आहेत. महाराष्ट्रातील सिंचन घोट्याळ्यातदेखील खत्री कुटुंबाचे नाव आले आहेत. ते पुढे म्हणाले की, खटल्याचा योग्य तपास न केल्याबद्दल मुंबई पोलिसांना दोषी ठरवण्यात येऊ शकते.
हे पण वाचा :
रिया चक्रवर्ती, तिच्या भावाला केव्हाही होऊ शकते अटक, ड्रग पेडलरशी थेट संबंध असल्याचे उघड