सुशांतच्या ऑनस्क्रीन आईचा दावा; कोरोनाचे निदान करणाऱ्या अॅपवर करत होता काम!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 18:48 IST2020-08-23T18:47:28+5:302020-08-23T18:48:25+5:30
सुशांतची ऑनस्क्रीन आई म्हणजेच ‘एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातील त्याच्या आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री नीता मोहिंद्रा यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे.

सुशांतच्या ऑनस्क्रीन आईचा दावा; कोरोनाचे निदान करणाऱ्या अॅपवर करत होता काम!!
सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये दिवसागणिक नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. सुशांतच्या संबंधित अनेक लोक आता समोर येऊन बोलत आहेत. दरम्यान, सुशांतची ऑनस्क्रीन आई म्हणजेच ‘एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातील त्याच्या आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री नीता मोहिंद्रा यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. यात त्या म्हणतात की, ‘सुशांत कोरोनाचे निदान करणाऱ्या अॅपवर काम करत होता. ज्यामुळे काही क्षणातच त्या व्यक्तीला कोरोना झालाय की नाही समजणार होते.’
सुशांतच्या ऑनस्क्रीन आई नीताच्या मते, सुशांत हा खुपच क्रिएटिव्ह मुलगा होता. त्याने खुप वेगवेगळया माध्यमात उत्कृष्ट काम केले होते. तो एका अशा अॅपवर काम करत होता, ज्यात मोबाईलमध्ये श्वास घेऊन कोविड-१९च्या संक्रमणाची माहिती मिळू शकत होती.
नीता यांच्या म्हणण्यानुसार, सुशांत हा एक मस्तमौला, दिलखुलास व्यक्तिमत्त्व असलेला व्यक्ती होता. आयुष्य जगण्यात त्याला खुप आनंद मिळायचा. त्या सुशांतला सर्वांत शेवटी ‘एम.एस.धोनी: अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत भेटल्या होत्या.
त्या पुढे म्हणाल्या,‘सुशांत एवढा हरहुन्नरी कलाकार होता की, ज्याच्या जाण्यामुळे बॉलिवूडसोबतच त्याच्या चाहत्यांनाही प्रचंड मोठा धक्का बसला आहे. त्याची हत्या झाली असेल तर ही गोष्ट अत्यंत दु:खद आहे. जर त्याने आत्महत्या केलीय तर त्याने का केली? हा प्रश्न आहे. कारण त्याच्याकडे जगण्यासारख्या खुप गोष्टी होत्या.