मन की बात फॉर SSR ! सुशांतचे चाहते पीएम मोदींकडे मागणार दाद
By रूपाली मुधोळकर | Published: October 13, 2020 01:26 PM2020-10-13T13:26:24+5:302020-10-13T13:31:07+5:30
सुशांतच्या चाहत्यांना अजूनही न्यायाची प्रतीक्षा
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूला अनेक महिने उलटले. यादरम्यान एम्स अहवालाने सुशांत प्रकरणाची दिशाच बदलली. दिल्लीच्या एम्स रूग्णालयाने सुशांतची हत्या नसून आत्महत्याच असल्याचा अहवाल दिला. सुशांतचे कुटुंबीय व चाहत्यांनी या अहवालावर अनेक प्रश्न उपस्थित केलेत. आता सुशांतची बहीण श्वेता व चाहत्यांनी एकत्र येत आपली ‘मन की बात’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे.
This seems like a good opportunity to raise our voices for justice and truth #MannKiBaat4SSR We can stay united in this endeavor and show that public is awaiting justice. 🙏❤️🙏 I even want to thank my extended family to always stand by us. Much Love ❤️ pic.twitter.com/83W8VY764R
— Shweta Singh Kirti (@shwetasinghkirt) October 12, 2020
सुशांतची बहीण श्वेताने याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ‘न्याय आणि सत्यासाठी #MannKiBaat4SSR आवाज उठवण्याची ही एक चांगली संधी आहे. याद्वारे जनता एकजूट आहे आणि आम्हाला अजूनही न्यायाची प्रतीक्षा आहे, हे याद्वारे आपण दाखवू शकतो. या लढ्यात सोबत असणा-यांचे मी आभार मानते, ’ असे ट्वीट श्वेताने केले आहे.
काय आहे मन की बात फॉर एसएसआर
Millions Of Voice Messages Will Be Recorded For our SSR.❤️
— $@uR@BH @N$HU (@my_lyff) October 13, 2020
And Prime Minister @narendramodi Ji Will Have To Answer On Man Ki Baat For SSR Case. please..🙏#BiharRaiseVoice4SSR@nilotpalm3@shwetasinghkirt
Abki baar sirf SSR Ki baat #MannKiBaat4SSRpic.twitter.com/zB8tOjn9zX
‘MannKiBaat4SSR ’ ही एक दिवसाची मोहिम आहे. याद्वारे सुशांतला न्याय मिळवून देऊ इच्छिणारा प्रत्येकजण आपला संदेश रेकॉर्ड करून वा लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवू शकेल. उद्या 14 ऑक्टोबरला सकाळी 8 ते रात्री 8 या वेळात चाहते आपला संदेश पीएम मोदींपर्यंत पोहोचवू श्कतील. यासाठी सुशांतसाठी फेसबुक, ट्विटर वा इन्स्टाग्राम पोस्ट करताना पीएमओ व पीएम यांच्या अधिकृत सोशल हँडल्सला टॅग करायचे आहे.
सुशांत 14 जूनला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला होता. यानंतर सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या झालीये असा दवा त्याच्या कुटुंबाने केला होता. सुशांतच्या चाहत्यांनीही त्याची हत्या झालाचा संशय व्यक्त करत, त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर अनेक मोहिम राबवल्या होत्या. MannKiBaat4SSR ही त्यापैकीच एक मोहिम आहे.
सुशांतच्या फॅमिलीने शेअर केला व्हिडीओ
सुशांतच्या निधनाला आता साधारण 4 महिने झाले आहेत. सुशांतचे फॅन्स अजूनही त्याच्या आठवणी शेअर करताना दिसतात. ते त्याचे व्हिडीओज आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. नुकताच सुशांतच्या फॅमिलीच्या 'यूनायटेड फॉर सुशांत सिंह राजपूत' या ट्विटर अकाऊंटवर त्याच्या 'शुद्ध देसी रोमांस' सिनेमातील एक व्हिडीओ क्लिप शेअर करण्यात आली.
: ( pic.twitter.com/L6YGEgg4j9
— United for #SushantSinghRajput (@sushantf3) October 12, 2020
ट्विटर अकाऊंटर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत सुशांत सिंह राजपूत म्हणत आहे की, 'एक बात बड़ी क्लियर हुई भाईसाहब, प्यार में हिसाब नहीं होता, सीधा राजधानी एक्सप्रेस चलती है'. सुशांतच्या या डायलॉगवर त्याचे फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत.
‘सुशांत प्रकरणाची गळा दाबून हत्या केली गेली...’; तपास यंत्रणांवर भडकले शेखर सुमन!!
मी नाही पाहिले, कोणाकडून तसे ऐकले होते...! सीबीआयसमोर रिया चक्रवर्तीच्या शेजारी महिलेचा युटर्न