Shocking : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूडला बसला जबर धक्का
By रवींद्र सखाराम मोरे | Published: June 14, 2020 04:41 PM2020-06-14T16:41:14+5:302020-06-14T17:06:35+5:30
सुशांतचे बॉलिवूडमधले यश हे अनेकांना प्रेरणादायी होते. तरीही त्याने आत्महत्येसारखी टोकाची भूमिका का घेतली हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. त्याच्या आत्महत्येने अनेक सेलेब्रिटींना धक्का पोहचला असून त्यांनी आपले दु:ख ट्विटद्वारे व्यक्त केले आहे.
टीव्ही मालिकेपासून बॉलिवूड पर्यंत यशस्वी मजल मारणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येच्या बातमीने अख्ख्या बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. सुशांतचे बॉलिवूडमधले यश हे अनेकांना प्रेरणादायी होते. तरीही त्याने आत्महत्येसारखी टोकाची भूमिका का घेतली हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. त्याच्या आत्महत्येने अनेक सेलेब्रिटींना धक्का पोहचला असून त्यांनी आपले दु:ख ट्विटद्वारे व्यक्त केले आहे.
* अक्षय कुमार
Honestly this news has left me shocked and speechless...I remember watching #SushantSinghRajput in Chhichhore and telling my friend Sajid, its producer how much I’d enjoyed the film and wish I’d been a part of it. Such a talented actor...may God give strength to his family 🙏🏻
— Akshay Kumar (@akshaykumar) June 14, 2020
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्त्याची बातमी ऐकून सर्वचजण अगदी सुन्न झाले. अक्षयने ट्विट करुन दु:ख व्यक्त केले की, ‘प्रामाणिकपणे सांगतो, या बातमीने मला स्तब्ध आणि अवाक केले. मला आठवते की, मी ‘छिछोरे’मध्ये सुशांत सिंग राजपूतला पाहत होतो आणि माझा मित्र साजिदला सांगत होतो की, या चित्रपटाच्या निर्मात्याने चित्रपटाचा किती आनंंद घेतला आहे आणि असे वाटत आहे की या चित्रपटाचा हिस्सा असतो तर...असा प्रतिभाशाली अभिनेता....परमेश्वरा, त्याच्या कुटुंबियांना शक्ती दे.!
* रितेश देशमुख
Shocked beyond words !!!! #SushantSinghRajput no more .... deeply saddened!!
— Riteish Deshmukh (@Riteishd) June 14, 2020
अभिनेता रितेश देशमुखनेही ट्विट करुन सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली दिली आहे, रितेशने ट्विटमध्य लिहिले आहे की, ‘दु:ख व्यक्त करताना शब्द सापडत नाहीयत..., सुशांत सिंग राजपूत नाही राहिलेत....खूपच दु:ख झाले!
* अजय देवगन
The news of Sushant Singh Rajput’s death is truly sad. What a tragic loss🙏 Deepest condolences to his family & loved ones. May his soul find eternal peace.
— Ajay Devgn (@ajaydevgn) June 14, 2020
अजय देवगननेही सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्याने दु:ख व्यक्त केले आहे. अजयने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने खूपच दु:ख झाले आहे, खूपच दु:खद नुकसान आहे. त्याचे कुटुंब आणि प्रियजनांच्या प्रति खूपच संवेदना आहे. त्याच्या आत्म्याला शाश्वत शांती मिळो..!’
* वरुण धवन
I really can’t believe this. Sushant was a wonderful actor and I still remember the times I spent with him. His performance always inspired me. Deepest condolences to his fans and family. RIP #SushantSinghRajput
— Varun Dhawan (@Varun_dvn) June 14, 2020
वरुण धवनलाही सुशांतच्या आत्महत्येवर विश्वास ठेवणे कठीण जात आहे. सुशांत सिंह आता या जगात नाहीय, हे त्याच्या मनाला पटतच नाहीय. वरुणने ट्विट करुन लिहिले आहे की, ‘मी वास्तवात यावर विश्वासच करु शकत नाही. सुशांत एक अद्भुत अभिनेता होते आणि मी आजही त्यांच्यासोबतचे क्षण स्मरण केले. त्यांच्या प्रदर्शनाने मला नेहमी प्रेरित केले आहे. त्यांचे कुटुंब आणि प्रशंसकांप्रति खूपच संवेदना...!’
* विशाल दादलानी
#SushantSinghRajput too? What is going on? Fuck!!! Strength and condolences to the bereaved. This is horrible, horrible news. :/
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) June 14, 2020
Please take care of yourselves and your families, and talk to your friends.
🙏🏼
सिंगर आणि म्यूझिक कंपोजर विशाल दादलानीदेखील या बातमीने स्तब्ध झाले. विशालने आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहिले आहे की, ‘सुशांत सिंग राजपूत देखील? काय होत आहे हे? संताप होतोय. ही भयानक, भयानक बातमी आहे. कृपया आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आणि आपल्या मित्रांशी गप्पा मारा..!
* विक्की कौशल
Shocked beyond words. #SushantSinghRajput 💔
— Vicky Kaushal (@vickykaushal09) June 14, 2020
विक्की कौशललाही या बातमीने मोठा धक्का बसला आहे. विक्कीने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘शब्द सापडत नाहीयत..’! सोबतच त्याने सुशांत सिंग राजपूतचे नाव लिहून तुटलेले मन दर्शविणारे इमोजी देखील बनविले आहे.
* ऋचा चड्ढा
या बातमीचा ऋचा चड्ढालाही धक्काच बसला. सुशांत सिंग गेल्याचा तिला विश्वासच बसत नाही. तिने ट्विटवर लिहिले की, ‘माझे हात खूपच थरथरत आहेत, जर एखाद्या गोष्टीवरुन तू नाराज होता तर त्याबाबत मला कॉल करुन चर्चा केली असती, आम्ही सर्व इथेच होतो, तुझ्यासोबत...!’