रियाच्या तक्रारीनंतर सुशांतच्या बहिणीने दिली 'ही' मोठी प्रतिक्रिया, म्हणाली- आम्हाला खोटी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 04:30 PM2020-09-08T16:30:15+5:302020-09-08T16:42:16+5:30

सुशांत सिंग राजपूतचे कुटुंब अभिनेत्याच्या मृत्यूसाठी रियाला कारणीभूत मानते.

Sushant singh sister shweta reacts on fir filed by rhea chakraborty against priyanka tmov | रियाच्या तक्रारीनंतर सुशांतच्या बहिणीने दिली 'ही' मोठी प्रतिक्रिया, म्हणाली- आम्हाला खोटी...

रियाच्या तक्रारीनंतर सुशांतच्या बहिणीने दिली 'ही' मोठी प्रतिक्रिया, म्हणाली- आम्हाला खोटी...

googlenewsNext

सुशांत सिंग राजपूतचे कुटुंब अभिनेत्याच्या मृत्यूसाठी रियाला कारणीभूत मानते. रियाच्या विरोधात सुशांतच्या वडिलांनी पाटणामध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आता रियाने सुशांतची बहीण प्रियंका सिंह, मीतू सिंह आणि डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच सुशांतच्या बहिणींवर रियाने वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे, बेकायदेशी कृत्य करणे, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा यांसह कलम अशा एकूण 13 कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. रियाने तक्रार दाखल केल्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे.

आता रियावर सुशांतच्या कुटुंबीयांनी पलटवार केला आहे. सुशांतची बहीण श्वेता सिंग कीर्तिने पहिली प्रतिक्रिया दिली, कोणतीही गोष्ट आम्हाला तोडू शकतं नाही. एक खोटी FIR तर अजिबात नाही. #SSRFamilyStandsStrong #UnitedForSSRJustice #WholeIndiaIsSSRFamily


सुशांतचे वकील फॅमिली काय म्हणाले?
सोमवार एनसीबीची चौकशी संपल्यावर रियाने वांद्रातल्या पोलीस ठाण्यात जाऊन प्रियंकाने तक्रार दाखल करायला गेली होती. जवळपास 6 तास ती वांद्रा पोलीस ठाण्यात होती. रियाच्या या तक्रारीवर सुशांतचे वडील वकील सिंग म्हणाले, रिया या प्रकरणाला भटकवण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच त्यानी रियाला लवकरच अटक करण्याची मागणी केली आहे. 

रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलावण्याचा तयारीत

 

Web Title: Sushant singh sister shweta reacts on fir filed by rhea chakraborty against priyanka tmov

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.