सुशांतच्या घरात क्राईम सीन रिक्रिएट केल्यानंतर CBI पोहोचली कोणत्या निष्कर्षावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 03:59 PM2020-08-24T15:59:29+5:302020-08-24T16:14:04+5:30

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची सीबीआय कसून चौकशी करते आहे.

Sushant singh suicide case cbi observation after doing dummy test rhea chakraborty | सुशांतच्या घरात क्राईम सीन रिक्रिएट केल्यानंतर CBI पोहोचली कोणत्या निष्कर्षावर?

सुशांतच्या घरात क्राईम सीन रिक्रिएट केल्यानंतर CBI पोहोचली कोणत्या निष्कर्षावर?

googlenewsNext

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात सीबीआय कसून चौकशी करते आहे. अभिनेत्याच्या मृत्यूचे सत्य जाणून घेण्यासाठीचे प्रत्येक प्रयत्न सीबीआय करते आहे. सीबीआयला छोट्यातल्या छोट्या गोष्टीची देखील चौकशी करते. सीबीआयने सुशांतच्या वांद्रे फ्लॅटमध्ये सीन रिक्रिएट केला होता.  जेव्हा सुशांतच्या रुमध्ये डमी सीन रिक्रिएट केल्यानंतर सीबीआयच्या एक गोष्ट लक्षात आली, ज्याचा खुलासा आता झाला आहे. 

आजतकच्या रिपोर्टनुसार, सुशांतच्या रुममध्ये डायग्राम फॉरेन्सिक मुंबई पोलीस आणि सीबीआयने तयार केला होता. पंख्यापासून गादीपर्यंतची उंची 5 फूट 11 इंच आहे. गुगलनुसार सुशांतची उंची 5 फूट 10 इंच होती.  मात्र सुशांतचे म्हणणे होते की तो 6 फूटांचा आहे. पलंगापासून गद्दाची उंची 1 फूट 9 इंच आहे. गादीची उंची 8 इंच आहे. गद्दाची उंची खोलीच्या कमाल मर्यादेपासून 9 फूट 3 इंच आहे. POP ते फ्लोअरपर्यंतची उंची 8 फूट 11 इंच आहे. सुशांतचा मृतदेह 8 फूट 11 इंचाच्या अवस्थेत आढळला. बाथरोबचा पट्टा तुटलेला होता.


रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाच्या चौकशीसाठी सीबीआयने त्यांना समन्स बजावला आहे. सुशांतच्या जवळच्या मित्रांची चौकशी करण्यात आली आहे. आता प्रकरणात आणखीन एक नवीन नाव समोर आले आहे. ज्याची सीबीआय चौकशी करणार आहे.

Web Title: Sushant singh suicide case cbi observation after doing dummy test rhea chakraborty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.