सुशांत आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, सुशांत आणि दिशा सालियनच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून झाले नवीन खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 11:18 AM2020-08-18T11:18:56+5:302020-08-18T11:19:28+5:30
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. सुशांतच्या निधनाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात त्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. तर त्याच्या निधनाच्या एक आठवडाआधी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिने मुंबईतील एका बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केली होती. सुशांतची आत्महत्या आणि दिशाच्या आत्महत्ये मागे काही कनेक्शन आहे का, हे तपासले जात आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आता कित्येक नवीन खुलासे होत आहेत. दिशा मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. सुशांत आणि दिशा आत्महत्या प्रकरण साधारण प्रकरण मानले जात नाही आहे. त्यात आता या आत्महत्या प्रकरणात नवीन वळण आले आहे. टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन दोघेही एप्रिल महिन्यापासून एकमेकांच्या संपर्कात होते. कामा संबंधात त्यांचे सातत्याने बातचीत होत होती.
टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, रिपोर्ट्समध्ये म्हटलं गेलं आहे की सुशांत आणि दिशा एकमेकांच्या एप्रिल महिन्यापासून टचमध्ये होते. समोर आलेल्या चॅटनुसार समजते आहे की दिशा सुशांतचे पीआर मॅनेज करत होती. त्या दोघांचे कित्येक नवीन प्रोजेक्टवर बोलणे झाले होते. याशिवाय सुशांतने आपल्या चॅटमध्ये याचाही उल्लेख केला होता की त्याला टीव्ही कमर्शिएल्सचे ऑफर येत होते.
टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार दोघांमध्ये 2,7,9 आणि 11 एप्रिलला व्हॉट्सएप चॅट झाले होते. त्या दोघांमधील संभाषण खूप प्रोफेशनल होते.
सुशांत एका जाहिरातीत काम करणार होता जी तेल कंपनीसाठी होते. या जाहिरातीसाठी त्याला साठ लाख रुपये मानधन मिळणार होते.
याशिवाय या व्हॉट्सएप चॅटनुसार गेम पबजीसाठी एक डिजिटल कॅपेंनचादेखील भाग होणार होता. या चॅटमध्ये सुशांतने सिद्धार्थ पिठानीचे देखील नाव घेतले होते.