बॉलिवुडमध्ये आल्यानंतर इतकी होती सुशांतची पहिली कमाई !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 13:28 IST2020-06-15T13:21:09+5:302020-06-15T13:28:25+5:30
सुशांत सिंह राजपूतला खरी ओळख 2009 ते 2011 दरम्यान आलेली मालिका 'पवित्र रिश्ता'मालिकेमधून मिळाली.

बॉलिवुडमध्ये आल्यानंतर इतकी होती सुशांतची पहिली कमाई !
सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो.
सुशांतने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, स्ट्रगल काळात तो सहाजणांसोबत रुम शेअर करत होता. यादरम्यान एका नाटकासाठी त्याला 250 रुपये मिळाले होते. सुशांत कधी-कधी चित्रपटात हिरो-हिरोइनच्या मागे नाचणारा डान्सर म्हणूनही काम करायचा.
सुशांतने 2015 मध्ये पाली हिलमध्ये 20 कोटी रुपयांचा एक पेंटहाउस खरेदी केला. सुशांत आपल्या घरातील लिविंग रुमला ट्रॅव्हलिंग रुम म्हणायचा. सुशांतच्या घरात एक मोठा टेलिस्कोप आहे, ज्याला तो 'टाइम मशीन' म्हणायचा. यातून तो वेगवेगली ग्रह आणि गॅलेक्सीज पाहायचा.
सुशांतला 2008 मध्ये टीव्हीवर पहिला ब्रेक बालाजी टेलीफिल्म्सचा शो 'किस देश में है मेरा दिल'मध्ये मिळाला. परंतू, त्याला खरी ओळख 2009 ते 2011 दरम्यान आलेली मालिका 'पवित्र रिश्ता'मधून मिळाली. साचेबद्ध काम करण्यात रस नसून वेगळे काहीतरी करण्याच्या प्रयत्न करणा-यापैकी सुशांत होता. त्यानंतर सुशांतला 2013 मध्ये बॉलिवूडचा पहिला चित्रपट 'काई पो छे' मिळाला. या चित्रपटानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. सुशांत एका चित्रपटासाठी 5-7 कोटी रुपये चार्ज करत होता.