सुशांतची हत्या की आत्महत्या?, व्हिसेरा रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा

By तेजल गावडे | Published: September 29, 2020 11:30 AM2020-09-29T11:30:23+5:302020-09-29T11:31:26+5:30

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात एम्स पॅनेल द्वारे सीबीआयला दिलेला रिपोर्ट समोर आला आहे.

Sushant's murder or suicide ?, a big revelation from the Viscera report | सुशांतची हत्या की आत्महत्या?, व्हिसेरा रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा

सुशांतची हत्या की आत्महत्या?, व्हिसेरा रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता दोन महिन्यांहून जास्त काळ उलटून गेला आहे. तरीदेखील अद्याप त्याच्या आत्महत्ये मागचे कारण समोर आलेले नाही. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान एम्स पॅनेल द्वारे सीबीआयला व्हिसेरा रिपोर्ट सोपवण्यात आला आहे. त्यात सुशांतच्या मृत्यू संबंधीत मोठा खुलासा झाला आहे. 

आज तकच्या रिपोर्ट्सनुसार, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात एम्स पॅनेल द्वारे सीबीआयला दिलेला रिपोर्ट मिळाला आहे. ज्यात मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांतला विष देण्यात आले नव्हते. सुशांतच्या व्हिसेरामध्ये विष सापडले नाही. एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतच्या शरीरात कोणतेही ऑर्गेनिक विष सापडले नसल्याचे नमूद केले आहे. 


सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात कूपर हॉस्पिटलला पूर्णपणे क्लीनचिट अद्याप दिलेले नाही. एम्स पॅनेलने कूपर हॉस्पिटलचा रिपोर्ट सविस्तर पाहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. कूपर हॉस्पिटल अद्याप प्रश्नांच्या कचाट्यात सापडलेले आहे. एम्सच्या रिपोर्टमधून इशारा देण्यात आला आहे की कूपर हॉस्पिटलने सुशांत आत्महत्या प्रकरणात हलगर्जीपणा केला आहे. कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सुशांतची ऑटोप्सी केली होती. ज्यावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. सुशांतच्या गळ्यावरील निशाण्यांबद्दल रिपोर्टमध्ये काहीच सांगितले नव्हते. सुशांतच्या निधनाची वेळदेखील सांगितली नव्हती.

सुशांतच्या कुटुंबाने रियावर केले होते आरोप
सुशांतच्या कुटुंबांच्या वकीलांनी सुशांतला मृत्यूपूर्वी विष दिल्याची शंका व्यक्त केली होती. मात्र आता एम्सच्या रिपोर्टनुसार हे स्पष्ट झाले आहे की सुशांतला कोणत्याही प्रकारचे विष दिलेले नव्हते. सुशांतच्या कुटुंबाने सुशांतच्या आत्महत्याला हत्या म्हटले होते. सुशांतच्या वडिलांनी रियावर त्यांच्या मुलाला विष दिल्याचा आरोप केला होता.


सुशांतच्या कुटुंबियांनी रिया चक्रवर्तीला या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हटले आहे. रियाच्या विरोधात तीन एजेंसी तपास करत आहेत. सीबीआयने रियाची चौकशी केली होती. तसेच ईडीनेदेखील तिची चौकशी केली. ड्रग्स प्रकरणी एनसीबीने रियावर कारवाई केली आहे. सध्या रिया ड्रग्स प्रकरणात भायखळा जेलमध्ये मागील २२ दिवसांपासून कैद आहे. रियावर आरोप आहे की ती सुशांतसाठी ड्रग्स विकत घेत होती.

Web Title: Sushant's murder or suicide ?, a big revelation from the Viscera report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.