Sushant Singh Rajput: "रियाला पुढे करून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार बड्या हस्तींना वाचवतंय"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 07:35 PM2020-08-29T19:35:56+5:302020-08-29T20:25:47+5:30
Sushant Singh Rajput: या प्रकरणातील गुंता दिवसंदिवस वाढतच चालला आहे.
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीभोवती चौकशीचा फास आवळत चालला आहे. ईडी, सीबीआय आणि एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहेत आणि रियाची देखील कसून चौकशी केली जात आहे. मात्र, रिया तपास अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक देत नसल्याने सीबीआय रियासह अन्य आरोपींची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची शक्यता आहे. त्यात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी खळबळजनक दावा केला आहे. रिया चक्रवर्तीला पुढे करून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार बड्या हस्तींना वाचवत असल्याचा, दावा अग्निहोत्री यांनी केला आहे.
अग्निहोत्री यांनी ट्विट केलं की,''एकदा फार्म हाऊसवर सुशांत सिंग राजपूत दुसऱ्यांवर अबलंबून असणाऱ्या स्टारवर ज्यांना अन्य स्टार्सनी लाँच केलं, त्यावर चर्चा करत होता. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या स्टारला राग अनावर झाला आणि त्यानं सुशांतला इतरांप्रमाणे तुझंही करिअर संपवेन, अशी धमकी दिली. रिया हा फक्त चेहरा आहे. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार बड्या हस्तींना वाचवत आहेत.''
Trivia: Once, in a farm house, SSR had an argument with a Star protege whom the star had launched. The star lost his temper and threatened SSR that he would finish his career like he did with others.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) August 29, 2020
Rhea is just a facade. MuM Pol & Mah Govt is protecting very powerful people.
#RheaChakraborty is just a facade, filmmaker Vivek Agnihotri (@vivekagnihotri) has alleged. #MumbaiPolice and #Maharashtra government are protecting some very powerful people in the #SushantSinghRajput death case, Agnihotri claimed. pic.twitter.com/xmaXlBo4Nk
— IANS Tweets (@ians_india) August 29, 2020
CBI रियाची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची शक्यता
रिया तपास अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक देत नसल्याने सीबीआय रियासह अन्य आरोपींची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची शक्यता आहे. रियाची पॉलिग्राफ टेस्ट करण्याबाबत जोरदार चर्चा देखील सुरू आहे. काल सीबीआयने रियाची जवळपास 10 तास चौकशी केली, अनेक प्रश्न विचारले. मात्र, रिया खरं बोलते की खोटं याची तपासणी करण्यासाठी पॉलिग्राफ टेस्ट केली जाऊ शकते.
पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे काय?
पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे खोटं पकडण्याची चाचणी, ही विज्ञानात लावण्यात आलेल्या अनेक रंजक शोधांपैकी एक टेस्ट. यात एखादा माणूस खोटं बोलत असला की त्याच्या शारीरिक क्रियांमध्ये किंचित बदल होतात, हेच बदल टिपून तो खरं बोलतोय की खोटं हे ठरवलं जातं.
पॉलिग्राफ टेस्ट कधीपासून सुरू झाली?
पॉलिग्राफ टेस्टचा सर्वात पहिला वापर १९२१ साली अमेरिकेतील जॉन ऑगस्टस लार्सन या पोलिस अधिकारी आणि वैद्यकीय अभ्यासकाने केला. एखादी व्यक्ती खरं बोलत असेल तेव्हा त्याचे रक्तदाब, नाडीचे ठोके, श्वासोच्छवास, शरीराचं तापमान सामान्य असतं. परंतु, जेव्हा ती खोटं बोलते, तेव्हा या सर्व घटकांमध्ये बदल होऊ लागतात. रक्तदाब-नाडीचे ठोके वाढून श्वासोच्छवास जोराने होऊ लागतो, याच तत्त्वाचा वापर लार्सन यांनी केला. सन १९२१ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील एका ख्रिश्चन धर्मगुरूची हत्या करण्याचा आरोप असलेल्या विल्यम हायटॉवर या व्यक्तीवर ही पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली. यात हायटॉवरला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं आणि पॉलिग्राफ टेस्टमध्ये दिसलेले निष्कर्ष याच्या आधारावर त्याला दोषी ठरविण्यात आलं. याआधी विल्यम मार्स्टन याने रक्तदाबावरून करण्यात येणाऱ्या या चाचण्यांचा प्रयत्न करून पाहिला होता. या चाचण्या उपयोगी असल्याचं पटवून देण्यासाठी त्याने अनेक प्रयत्नही केले. परंतु, त्यानंतर लार्सनने केलेल्या प्रात्याक्षिकामुळे त्याला समाजात मान्यता मिळाली.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्स संघातील पुणेकर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का; सुरेश रैनानं घेतली माघार, मायदेशी परतला
IPL 2020 : CSKचा कोरोना पॉझिटिव्ह गोलंदाज कोण ते समजलं; सुरेश रैनासह आलेला इतरांच्या संपर्कात
IPL 2020 : विमानतळावरील 'झप्पी' CSKच्या खेळाडूंना महागात पडली? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल