हार्टअटॅकमधून सावरताच सुश्मिताचा अॅक्शन मोड ऑन, हातात तलवार घेत दिले जबरदस्त सीन्स; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 16:25 IST2023-04-25T16:23:02+5:302023-04-25T16:25:24+5:30
आगामी 'आर्या सीझन 3' मधील तिचा लूक व्हायरल होतोय.

हार्टअटॅकमधून सावरताच सुश्मिताचा अॅक्शन मोड ऑन, हातात तलवार घेत दिले जबरदस्त सीन्स; Video व्हायरल
अभिनेत्री सुश्मिता सेनला (Sushmita Sen)अलीकडेच हृदयविकाराचा झटका आला. त्यातून सावरत असतानाच सुश्मिता कामावर परतली आहे. आगामी आर्या सीझन ३ मधील तिचा लूक व्हायरल होतोय. यामध्ये सुश्मिताने हातात तलवार उचललेली पाहायला मिळतेय. यासोबतच तिचे अॅक्शन मुव्ह्ज बघायला मिळत आहेत.
हॉटस्टारवरील 'आर्या' या गाजलेल्या सिरीजचा तिसरा भाग लवकरच येणार आहे. त्याच्या चित्रीकरणाला आता सुरुवात झाली आहे. 'आर्या 3' च्या फर्स्ट लुकमध्ये सुश्मिता तलवारीसोबत अॅक्शन करताना दिसत आहे. त्यामुळे सुश्मिताने पुन्हा जबरदस्त कमबॅक केले आहे असं म्हणायला हरकत नाही.
'आर्या 3' चा हा फर्स्ट लुक पाहून चाहतेही खूश झालेत. त्यांना सिरीज हा लुक प्रचंड आवडलाय. आर्या सिझन 3 चे दिग्दर्शक राम माधवानी करणार आहेत. यामध्ये नमित दास, मनीष चौधरी आणि विनोद रावत यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. पहिल्या दोन्ही सिझनमध्ये सुष्मिताच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. आता सर्वांनाच तिसऱ्या भागाची प्रतिक्षा आहे.