एका प्रश्नाने बदलले होते सुष्मिता सेनचे नशीब, मिस इंडिया स्पर्धेत ऐश्वर्या राय पडली भारी होती
By गीतांजली | Published: November 19, 2020 07:00 AM2020-11-19T07:00:00+5:302020-11-19T07:00:02+5:30
1994 साली सुष्मिताने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता.
बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन आज आपला वाढदिवस साजरा करते आहे. 1994 साली सुष्मिताने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. याचवर्षी ती मिस युनिव्हर्स सुद्धा झाली होती. तेव्हा केवळ सुश्मिता 18 वर्षांची होती.
सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या रॉय दोघींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेचं आयोजन गोव्यात झाले होते. दोघेही मिस इंडिया होण्याच्या प्रबळ दावेदार होत्या. सुश्मिता स्वत: हे मान्य करत होती की ऐश्वर्या राय तिच्यावर भारी पडू शकते कारण ती खूप सुंदर आहे.
मिस इंडियाच्या शेवटच्या फेरीत सुष्मिता आणि ऐश्वर्या यांच्यात टाय झाली होती. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढले होते की, कोणाच्या डोक्यावर मिस इंडियाचा मुकुट असेल. जजने दोघांनी 9.33 नंबर दिले होते. यानंतर दोघांनी एक-एक प्रश्न विचारण्यात आला. जिचे उत्तर चांगले असले ती मिस इंडियाचा किताब जिंकणार आणि या प्रश्नाचे चोख उत्तर देत सुष्मिताने हा किताब आपल्या नावावर केला.
मिस युनिव्हर्स बनल्यानंतर सुश्मिता सिनेमा आणि बॉलिवूडकडे वळली. सध्या सुष्मिता तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. रोहमन शॉलसोबती ती रिलेशनशीपमध्ये आहे. दोघे एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.