Video : झोपाळ्याची दोरी तुटली अन्...! सुश्मिताच्या बॉयफ्रेन्डची अशी झाली फजिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 02:08 PM2021-07-13T14:08:58+5:302021-07-13T14:11:30+5:30
होय, सुश्मिता सेनचाबॉयफ्रेन्ड रोहमन शॉलचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. खुद्द रोहमनने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
सुश्मिता सेनचा (Sushmita Sen) बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल (Rohman Shawl) करायला गेला एक अन् झालं भलतेच. होय, त्याचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. खुद्द रोहमनने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
रोहमनचा हा व्हिडीओ एका सेटवरचा आहे. यात रोहमन कृष्ण बनलाय. एका स्वीमिंग पुलाच्यावर मधोमध बांधलेल्या झोपाळ्यावर कृष्ण बनलेला रोहमन बासरी वाजवतोय आणि त्याच्या अवतीभवती पाण्यात गोपिका आहेत. सीन चांगलाच रंगात आला असताना अचानक झोपाळ्याची दोरी तुटते आणि झोपाळा एका बाजूने कलंडतो. मग काय रोहमन झोपाळ्यावरून पाण्यात पडतात पडता कसाबसा स्वत:ला सावरतो.
‘शूटींग सुरू असताना झोपाळ्याची एक बाजूची दोरी अचानक तुटली आणि मी हवेत तरंगू लागलो,’ असे कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करताना रोहमनने दिले आहे.
सुश्मिता व रोहमन दीर्घकाळापासून लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. दोघांनीही आपली प्रेमकहाणी कधीच जगापासून लपवली नाही. सोशल मीडियावर दोघेही परस्परांसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत असतात. सुश्मिताच्या दोन्ही मुली रिनी व अलिशा यांच्यासोबतही रोहमनची चांगली बॉन्डिंग आहे.
अशी सुरू झाली होती रोहमन व सुश्मिताची लव्हस्टोरी
रोहमन व सुश्मिताची लव्हस्टोरी एका टच स्क्रीन फोनमुळे सुरू झाली होती. होय, रोहमन सुश्मिताचा खूप मोठा फॅन आहे. एकदा त्याने सुशला इन्स्टावर एक पर्सनल मॅसेज पाठवला. या मॅसेजचे उत्तर मिळेल, ही अपेक्षाही त्याला नव्हती. कारण सुश्मिता कधीच आपल्या इन्स्टा हँडलवरचा डीएम अर्थात डायरेक्ट मॅसेजचे ऑप्शन कधी ओपन करत नव्हती.( हा ऑप्शन ओपन केल्यावर मॅसेज पाठवणा-यास वेलकम इन माय पर्सनल स्पेस अशा आशयाचा मॅसेज जातो.) एकदिवस सुश्मिता आपल्या मुलीसोबत काहीतरी बोलत असताना अचानक चुकून तिच्या हातून डायरेक्ट मॅसेजचे ऑप्शन ओपन झाले आणि रोहमनचा मॅसेज तिला मिळाला. रोहमनचा हा मॅसेज सुश्मिताला इतका आवडला की, तिने लगेच त्यावर रिप्लाय केला. सुश्मिताचा रिप्लाय आलेला पाहून रोहमनचे काय व्हावे? त्याचा आनंद गगणात मावेनासा झाला. मग काय मॅसेजचा हा सिलसिला सुरु झाला. यानंतर रोहमनने सुश्मिताला फुटबॉल ग्राऊंडवर त्याची मॅच पाहण्यासाठी बोलवले. ही त्यांची पहिली भेट. यानंतर दुस-या भेटीसाठी रोहमनने तिला कॉफीचे निमंत्रण दिले. अशाप्रकारे रोहमन आणि सुश्मिताच्या प्रेमाची गाडी पुढे गेली.