होय, आमचं नातं...! सुश्मिता सेनने रोहमनसोबतचं ब्रेकअप केलं कन्फर्म, वाचा पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 11:10 AM2021-12-24T11:10:50+5:302021-12-24T13:01:47+5:30

Sushmita Sen Break Up: रोहमन  सुश्मिताच्या घरीच राहायचा. मध्यंतरी हे जोडपं लग्न करणार अशाही चर्चा होत्या. पण त्याधीच रोहमनने सुश्मिताचं घर सोडलं आणि दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या...

sushmita sen breaks silence over his breakup rumours with rohman shawl | होय, आमचं नातं...! सुश्मिता सेनने रोहमनसोबतचं ब्रेकअप केलं कन्फर्म, वाचा पोस्ट

होय, आमचं नातं...! सुश्मिता सेनने रोहमनसोबतचं ब्रेकअप केलं कन्फर्म, वाचा पोस्ट

googlenewsNext

सुश्मिता सेन (Sushmita Sen) आणि तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल (Rohman Shawl)अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अगदी कौटुंबिक समारंभापासून बॉलिवूड पार्ट्यांपर्यंत हे जोडपं सोबत दिसायचं. इतकंच नाही तर रोहमन  सुश्मिताच्या घरीच राहायचा. मध्यंतरी हे जोडपं लग्न करणार अशाही चर्चा होत्या. पण त्याधीच रोहमनने  सुश्मिताचं घर सोडलं आणि दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या. आता काय तर सुश्मिताने ब्रेकअपच्या  (Sushmita Sen Break Up) बातमीवर शिक्कामोर्तब केलंय. होय,  सुश्मिताने इन्स्टावर एक पोस्ट टाकून ब्रेकअपची बातमी कन्फर्म केली आहे.

‘आमच्या नात्याची सुरूवात मित्र म्हणून झाली आणि यापुढेही आम्ही मित्र म्हणूनच ओळखले जाऊ. नातं फार आधीच संपलं होतं... प्रेम अद्यापही बाकी आहे,’ अशी पोस्ट सुश्मिताने शेअर केली आहे. सोबत रोहमनसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.

रोहमन हा सुश्मितापेक्षा 15 वर्षांनी लहान होता. त्यामुळे दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा सुरू झाली, तेव्हाच हे नातं फार काळ टिकणार नाही, असं मतं अनेकांनी व्यक्त केला होतं. पण यानंतरच्या काळात रोहमन व सुश्मिता आणखीच जवळ आले होते. अगदी रोहमन  सुश्मिताच्या घरीच शिफ्ट झाला होता.

सुश्मिताच्या दोन्ही मुलींसोबतही त्याचं खूप चांगलं ट्युनिंग होतं.  सुश्मिताच्या भावाचं लग्न झालं तेव्हा रोहमन या लग्नात अगदी घरच्यासारखा वावरताना दिसला होता. असं सगळं सुरूळीत असताना अचानक रोहमन  सुश्मिताचं घर सोडून मित्रांच्या घरी राहू लागला आणि दोघांत बिनसल्याची चर्चा सुरू झाली.

तशी याआधीही फेब्रुवारी महिन्यात दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा कानावर आल्या होत्या. पण यानंतर अचानक दोघंही एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. 2018 साली शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत  सुश्मिता  व रोहमन यांनी हातात हात घालून पोज दिल्या होत्या. यानंतर काही महिन्यांनी दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती. रोहमन व सुश्मिता दोघेही लग्न करणार अशीही चर्चा होतीच.

Web Title: sushmita sen breaks silence over his breakup rumours with rohman shawl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.