सुश्मिता सेनची लेक रिनी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज, या सिनेमातून होतोय डेब्यू
By रूपाली मुधोळकर | Updated: October 4, 2020 17:12 IST2020-10-04T17:04:32+5:302020-10-04T17:12:22+5:30
रिनी सेन पूर्ण करणार अभिनेत्री बनण्याचे स्वप्न..

सुश्मिता सेनची लेक रिनी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज, या सिनेमातून होतोय डेब्यू
बॉलिवूडमधील नेपोटिजम अर्थात घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत असताना आता आणखी एक स्टार किड बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झाली आहे. नाव काय तर रिनी सेन. होय, अभिनेत्री सुश्मिता सेनची लेक रिनी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय.
रिनी नुकतीच 21 वर्षांची झाली आणि आता ती अभिनेत्री बनण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करणार आहे. तिच्या पहिल्या सिनेमाचे नाव ‘सुट्टाबाजी’ असल्याचे कळतेय. या सिनेमाच्या सेटवरचे फोटोही समोर आले आहेत.
चर्चा खरी मानाल तर या चित्रपटात लॉकडाऊन काळातील एक कथा दाखवली जाणार आहे. लॉकडाऊनच्या काळात एका कुटुंबाच्या नात्यांची कथा यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अद्याप या आगामी चित्रपटाबद्दलचे अन्य तपशील उघड झालेले नाहीत. पण रिनी यात एका बिघडलेल्या मुलीची भूमिका साकारणार असल्याचे कळते.
कोमल छाबडिया आणि राहुल वोहरा रिनीच्या पालकांची भूमिका साकारणार आहेत. दिग्दर्शन कबीर खुराणा हा या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. हा सिनेमा थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचेही समजतेय. रिनी एक गायिका सुद्धा आहे. आपल्या या डेब्यू सिनेमात ती पार्श्वगायनही करणार आहे.
आईसारखेच अभिनेत्री होण्याचे रिनीचे स्वप्न आहे. सुश्मितानेही अनेक मुलाखतीत रिनीला अॅक्टिंग क्षेत्रात करिअर करायचे असल्याचे म्हटले होते.
तुम्हाला माहित आहेच की सुश्मिता सेन सिंगल मदर आहे. चाळीशी कधीच ओलांडलेल्या सुश्मिता सेनने अद्यापही लग्न केलेले नाही. पण ती आई मात्र कधीच झालेय.
वयाच्या उण्यापु-या २७ व्या वर्षी सुश्मिताने सिंगल मदर बनण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आणि पहिली मुलगी रिनीला दत्तक घेतले. यानंतर दहा वर्षांनी म्हणजे २०१० मध्ये तिने दुसरी मुलगी अलिशा हिला दत्तक घेतले. रिनी आणि अलिशा सुश्मिताच्या जीव की प्राण आहेत. ती एकटीच्या बळावर या दोघींचे संगोपन करतेय.
सुश्मिता सध्या रोहमन शॉल या पेशाने मॉडेल असलेल्या तरूणाला डेट करतेय. त्याच्यासोबतचे अनेक रोमॅन्टिक फोटो ती शेअर करत असते. रोहमन हा सुश्मितापेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचेही मानले जात आहे.
एक प्रेम कहाणी सगळ्यांपेक्षा न्यारी... ! सुश्मिताने सेनने सांगितली तिची ‘लव्हस्टोरी’, पाहा व्हिडीओ
एक खंगलेले शरीर आणि प्रचंड नैराश्य...! चार वर्षे या गंभीर आजाराशी झुंज देत होती सुश्मिता सेन