Sushmita Sen Heart Attack: ४७ वर्षांच्या सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, पार पडली अँजिओप्लास्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 04:53 PM2023-03-02T16:53:31+5:302023-03-02T16:54:33+5:30

Sushmita Sen Heart Attack: वेळेवर उपचार मिळाल्याने बचावली सुश्मिता, पोस्ट शेअर करत दिली माहिती...

sushmita sen had a heart attack angioplasty done heart attack | Sushmita Sen Heart Attack: ४७ वर्षांच्या सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, पार पडली अँजिओप्लास्टी

Sushmita Sen Heart Attack: ४७ वर्षांच्या सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, पार पडली अँजिओप्लास्टी

googlenewsNext

Sushmita Sen Heart Attack: बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिनं आज एक धक्कादायक बातमी चाहत्यांशी शेअर केली. दोन दिवसांपूर्वी सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आला होता. अर्थात आता तिची प्रकृती ठणठणीत आहे. सुश्मिताने स्वत: पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
वडिलांसोबतचा एक फोटो तिने पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने तिच्या प्रकृतीबद्दल लिहिलं आहे. वडिलांच्या शब्दांनी तिने पोस्टची सुरूवात केली आहे.

सुश्मिताची पोस्ट
ती लिहिते, तुझं हृदय मजबूत व आनंदी ठेव... वाईट काळात जेव्हा तुला त्याची सर्वाधिक गरज असेल, तेव्हा तेच तुला सोबत करेल..., या महान ओळी माझ्या वडिलांच्या आहेत. मला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. माझी ॲंजिओप्लास्टी झाली. हृदय आता ठणठणीत आहे आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे, माझ्या कार्डिओलॉजिस्टने कन्फर्म केलंय की, माझं हृदय खरोखर खूप मोठं आहे. अनेकजण आहेत, ज्यांचे मी आभार मानू इच्छिते. त्यांच्यामुळे मला योग्यवेळी योग्य ते उपचार मिळू शकले. ताबडतोब उपचार मिळाल्याने मी ठीक होऊ शकले. पुढच्या पोस्टमध्ये मी त्याबद्दलही लिहिणार आहे. मी आता एकदम ठीक आहे, हे सांगण्यासाठी आजची ही पोस्ट लिहिली आहे. पुन्हा एकदा बिनधास्त आयुष्य जगण्यासाठी मी तयार आहे. तुम्हा सर्वांवर माझं प्रेम आहे..., अशा आशयाची पोस्ट सुश्मिताने शेअर केली आहे.

सुश्मिता ४७ वर्षांची आहे. फिटनेस फ्रिक म्हणून ती ओळखली जाते. सोशल मीडियावर ती रोज नवे वर्कआऊट व्हिडीओ शेअर करत असते. याऊपरही सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आला, हे वाचून अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी ती लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केली आहे.

Web Title: sushmita sen had a heart attack angioplasty done heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.