गोविंदाला पाहताच धावत आली सुष्मिता सेन; पापाराझींना म्हणाली, 'बोलू तर द्या यार...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 15:19 IST2024-12-15T14:53:48+5:302024-12-15T15:19:37+5:30
'क्योकी मै झूठ नही बोलता' सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं.

गोविंदाला पाहताच धावत आली सुष्मिता सेन; पापाराझींना म्हणाली, 'बोलू तर द्या यार...'
९० च्या दशकात गोविंदाच्या सिनेमांनी चाहत्यांना वेड लावलं होतं. त्याचा हटके डान्स, कॉमेडी सगळंच भन्नाट होतं. गोविंदा-करिष्मा, गोविंदा-सुष्मिता, गोविंदा-नीलम अशा अनेक जोड्या गाजल्या. आता बऱ्याच वर्षांनी नुकतंच गोविंदा (Govinda) आणि सुष्मिता सेनला (Sushmita Sen) एकत्र पाहिलं गेलं. एका इव्हेंटमध्ये गोविंदा रेड कार्पेटवर असताना तिकडून सुष्मिता आली. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
काल मुंबईत आयोजित एका इव्हेंटमध्ये गोविंदाने हजेरी लावली. रेड कार्पेटवर येत त्याने पापाराझींना पोज दिली. ब्लॅक जॅकेट आणि जीन्स मध्ये तो डॅशिंग अंदाजात दिसला. तोच समोरुन सुष्मिता सेन आली. ब्लॅक आऊटफिटमध्ये सुष्मिताला बघताच सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. गोविंदाला पाहताच सुष्मिता धावत आली. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. काही दिवसांपूर्वीच गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती. सुष्मिताने त्याची विचारपूस केली. दोघांनी थोडावेळ गप्पा मारल्या.तेवढ्यात पापाराझींनी त्यांना फोटोसाठी आग्रह केला. तेव्हा सुष्मिता वैतागून म्हणाली, 'बोलू तर द्या यार...'. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
गोविंदाने २००१ साली आलेल्या 'क्योकी मै झूठ नही बोलता' सिनेमात काम केलं होतं. त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडली. सिनेमातील डायलॉग, गाणी सगळंच खूप गाजलं होतं. चाहत्यांनीही या व्हिडिओवर कमेंट करत सिनेमाची आठवण काढली. गोविंदाचा आणि सुष्मिताला पुन्हा एकत्र पाहून चाहते खूश झाले.