ललित मोदींसोबतच्या रिलेशनशिपदरम्यान Sushmita Senने शेअर केला नवा फोटो, कॅप्शन बघून लोक म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 12:10 PM2022-07-17T12:10:10+5:302022-07-17T12:11:02+5:30
Lalit Modi and Sushmita Sen dating : आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदींनी सुष्मितासोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत, ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं जगजाहिर केलं होतं. आता सुष्मिताने एक नवी पोस्ट शेअर केली आहे आणि सध्या तिच्या पोस्टचीच चर्चा आहे.
सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या प्रचंड चर्चेत आहे. सध्या फक्त आणि फक्त तिचीच चर्चा सुरू आहे. बिझनेसमॅन ललित मोदींसोबतच्या रिलेशनशिपमुळे सध्या प्रत्येकजण तिच्याचबद्दल बोलतोय. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदींनी (Lalit Modi ) सुष्मितासोबतचे मालदीव व्हॅकेशनचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत, ते दोघे रिलेशनशिपमध्ये (Lalit Modi and Sushmita Sen dating ) असल्याचं जगजाहिर केलं होतं. अद्याप सुष्मिता थेटपणे यावर काहीही बोललेली नाही. फक्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती ‘हिंट’देत आहे. आता तिने एक नवी पोस्ट शेअर केली आहे आणि सध्या तिच्या पोस्टचीच चर्चा आहे.
सुष्मिताने मालदिव व्हॅकेशनदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिची धाकटी लेक अलिशा सेनने क्लिक केला आहे. ‘शांती... आणि गोंगाट कमी करण्याची ताकद...,’असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
चाहते म्हणाले, बकवास...
सुष्मिताच्या या नव्या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ललित मोदी व तिच्या रिलेशनशिपवर बोलताना सुष्मिताला पाठींबा दिला आहे. सुष्मिता, तुला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तुझं आयुष्य तुझे नियम. आनंदी राहा, अशा आशयाच्या कमेंट्स अनेक चाहत्यांनी केल्या आहेत. काही युजर्स मात्र सुष्मिताला ट्रोल करत आहेत. ही नेहमीप्रमाणे ललित मोदी प्रकरणावरून दिशाभूल करत आहे. बकवास..., असं म्हणत अनेकांनी सुष्मिताला ट्रोल केलं आहे.
याआधी सुष्मिताने एक पोस्ट शेअर करत, ललित मोदी प्रकरणावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला होता. ‘ मी एका आनंदी स्थितीत आहे. ना लग्न झालंय ना रिंग आहे. माझ्या आजूबाजूला केवळ निरपेक्ष प्रेम आहे. खूप झालं स्पष्टीकरण... आता कामाला लागावं. माझ्याा आनंदात सहभागी झाल्याबद्दल खूप आभार. आणि जे नाही झालं त्यांच्याबद्दल घेणं देणं नाही,’ अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली होती.
सुष्मिता आणि ललित यांच्या रिलेशनशिपच्या बातमीनंतर त्यांच्या नात्याच्या अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्यांच्यातील वयाचं अंतर, ललित यांचं खाजगी आयुष्य, सुष्मिताचे आधीचे बॉयफ्रेंड अशा अनेक विषयांवर चर्चा होताना दिसत आहे.